कोविड-19 च्या कचऱ्यामुळे चंद्रपुर मनपा च्या कंत्राटी कामगारांच्या व सामान्य माणसाच्या जीवाला धोका.

संदीप तुरक्याल, चंद्रपुर शहर प्रतिनिधी
चंद्रपुर:- मनपाचे साफसफाई/घंटागाडी कचरा गोळा करणारे कंत्राटी कामगार नेहमीप्रमाणे आपले काम करीत आहेत. पण सध्याच्या कोव्हीड19 च्या दुसऱ्या लाटेतील महामारीमुळे बाधित झालेले रुग्ण आणि मृत्यू पावलेल्या रुग्णाणसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या हाईजिनिक उपकरणाचा, औषधांचा, इंजेक्शनचा, स्लाईनचा, बोटल्स, पॅड कचरा, हॅन्डग्लोस व प्लास्टिक नळ्यांचा व वापरलेल्या PPE किट्स कचरा अशा सर्व प्रकारचा कचरा खाजगी व शासकीय रुग्णालयातील बाधित कचरा चंद्रपुर मनपाच्या दैनंदिन कचरा उचलणार्या गाड्यांमध्येच वाहून नेण्यात येत आहे. हे महत्त्वाचे कोविड19 च्या बाधित रुग्णांचा कचरा वाहून नेण्यासाठी वेगळ्या प्रकारची गाडी वापरणे आवश्यक होते. पण उपरोक्त प्रकारचा सर्व कचरा डम्पिंग यार्ड मध्ये जमा केल्या जात आहे व तेथे भंगार जमा करणारे, मोकाट जनावर स्पर्श करून जनमानसात फिरत आहेत. यामुळे सुद्धा कोविड19 च्या बाधितांची संख्या वाढन्याची शक्यता नाकारता येत नाही. कामगारांना सुद्धा सुरक्षा कवचाची व्यवस्था करून देणे गरजेचे होते. पण आयुक्त, महापौर चंद्रपुर मनपा चंद्रपुर आणि यात बसलेले सत्ताधीश नगरसेवक यांनी ही व्यवस्था करणे आवश्यक होते. पण चंद्रपुर मनपा तील भोंगळ कारभारामुळे या दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या कामगारांचे जीव धोक्यात टाकण्यात येत आहे.
कामगारांच्या मागण्या:
1) कोविड19 चा कचरा उचलण्यासाठी दैनंदिन गाड्या न वापरता वेगळ्या गाड्यांची व्यवस्था करण्यात यावी.
2) कचरा गोळा करणार्या कंत्राटी कामगारांना संपूर्ण सुरक्षा किट देण्यात यावी. असे कंत्राटी कामगारांनी न्यूज प्रतिनिधीशी बोलतांना कळविले आहे.