जालना येथे अग्रसेन भवनमध्ये 110 बेडचे कोविड केअर सेंटरची उभारणी.

✒️सतीश म्हस्के जालना जिल्हा प्रतिनिधी ✒️
जालना,दि.25 एप्रिल:- जालना जिल्हा मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रक्रोप वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तोगडी पडत आहे. त्यामुळे जालना शहरातील अग्रसेन भवन येथे सुसज्ज आणि सर्व सुखसोयींनी युक्त अशा 110 खाटांच्या कोविड केअर सेंटरचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मिडीया वार्ता न्यूजशी बोलताना पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जालना जिल्हात आणि शहरात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, उपचारासाठी बेडची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जालना येथील अग्रसेन भवन या ठिकाणी सुसज्ज व सुखसोयींनी युक्त 110 खाटांची संख्या असलेले कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोविडबधितांना ठेवण्यात येणार असून पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ, औषधी तसेच ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती तसेच आमदार निधीतून हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here