आई बापा वीना पोरक्या मुलीला संकटात केली आर्थीक मदत सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ पंदिलवार

58

मनोज खोब्रागडे✒
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली(चामोर्शी):- चामोर्शी तालूकयातील आष्टी शहरांपासून जवळच असलेल्या ईलूर येथील एका मूलींच्या लग्न कार्य करीता सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ पंदिलवार यांचे कडून आज एक हात मदतीचा पूढे करून आर्थिक मदत देण्यात आली.

आष्टी ईलूर जिल्हा परिषद क्षेत्रात संजयभाऊ पंदीलवार हे नेहमी संकटात नागरिकांच्या मदतीला धावून जात असतात अशातच कोरोणाच्या संकटात एका अनात मूलीचे वडील दोन वर्षे पुर्वी मरण पावले होते तेव्हापासून या मूलीने आपल्या आई व लहान भावाचा सांभाळ करीत होती यावर्षी या मूलीचे लग्न जूळले माझ्या डोळ्यासमोर माझ्या मूलीचे लग्न लावून चार अक्षदा टाकतो असे मूलींच्या आईला वाटत होते. पण मूलींच्या डोक्यावर अक्षदा पडण्या अगोदर आईचा एक महिना अगोदरच मृत्यू झाला.

या मूलीचे लग्न 30 एप्रिलला होणार असून आई वडील विणा मूलगी पोरकी झाली हि माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ पंदिलवार यांनी आज अनात मूलीची भेट घेऊन आर्थीक मदत दिली व आस्थेने विचारपूस करून धिर दिला. यावेळी उपसरपंच रामचंद्र बामणकार. रामदास कोहपरे, तूशार झोडे, रमेश झोडे हे उपस्थित होते.