बीडमध्ये जावयाने केला धारदार शस्त्राचे वार करुन सासुची हत्या; महीलेचा पुतण्या जखमी.
बीडमध्ये जावयाने केला धारदार शस्त्राचे वार करुन सासुची हत्या; महीलेचा पुतण्या जखमी.

बीडमध्ये जावयाने केली धारदार शस्त्राचे वार करुन सासुची हत्या; महीलेचा पुतण्या जखमी.

बीडमध्ये जावयाने केला धारदार शस्त्राचे वार करुन सासुची हत्या; महीलेचा पुतण्या जखमी.
बीडमध्ये जावयाने केला धारदार शस्त्राचे वार करुन सासुची हत्या; महीलेचा पुतण्या जखमी.

 ✒ प्रा.श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड,दि.25 एप्रिल:- बीड जिल्हातील साळेगाव तालुक्यातुन एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे साळेगाव तालुक्यात सर्वीकडे खळबळ उडाली आहे. साळेगाव येथे एका जावयाने आपल्या सासुची हत्या केल्याचे समोर आले आहे.

साळेगाव येथे एका महिलेचा केज-कळंब राज्य महामार्गावर मृतदेह आढळून आल्याची घटना रविवार दि.25 ला समोर आली आहे. हा खून कोणी केला? हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र काही दुरीवर मृताचा महीलेचा पुतण्या जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्याने दिलेल्या माहितीवरून अवघ्या काही तासातच या हत्येचा उलगडा झाला आहे. मुलीचा नव-याने म्हनजेच जावयानेच धारदार शस्त्राचे वार करून सासूचा खून केल्याचे सांगण्यात आले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील घायगुडा पिंपळा येथील‌ सुलोचना माणिक धायगुडे वय 35 वर्ष या आपला पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे दोघे दुचाकीवरून साळेगाव येथे रविवारला सकाळी जावई अमोल वैजनाथ इंगळे यांना काही कामानिमित्त भेटण्यासाठी‌ आले होते. जावयास भेटून ते दोघे परत अंबाजोगाईला जात असताना केज-कळंब राज्य रस्त्यावरील एका हॉटेल समोर जावई व सासू यांच्यामध्ये वाद होऊन चांगलीच बाचाबाची झाली.

याचवेळी अमोल इंगळे याने भेटण्यासाठी आलेल्या सासू व चुलत मेहुण्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून सुलोचना (सासू) यांच्या चेहऱ्यावर, मानेवर व हातावर धारदार शस्त्राचे वार करून जखमी केल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला तर पुतण्याही जखमी झाला होता. घटनेनंतर अमोल इंगळे हा दुचाकीवरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. यावेळी घटनास्थळावर मिरची पूड व घड्याळ आढळून आली आहे. तर घटना स्थळालगत जखमी अवस्थेतील अंकुश धायगुडे यास पोलीस वाहन चालक कादरी यांनी पोलीस वाहनातून केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी अंकुश धायगुडे यांने पोलीसांना दिलेल्या माहितीवरुन खूनाच्या घटनेचा उलगडा होऊन जावयानेच सासूचा खून केला असल्याचे पोलीसांनी सांगितले. जखमी अंकुश धायगुडे याने दिलेल्या माहितीवरून अमोल इंगळे यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here