सिरसगाव येथिल ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आली कोरोना संदर्भात उपाययोजनांसाठी बैठक.

53

प्रा. अक्षय पेटकर ✒
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतीनिधी
सिरसगाव:- येथिल ग्रामपंचायतमध्ये सरपंच राजुभाऊ मंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वत्र वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज गावातील कोरोना परीस्थिती व उपाययोजना संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गावातील 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून काय कराता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आरोग्य सेविका, डॉ. शिल्पा राठी, तलाठी उमेशजी पोटे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायतीचे सदस्य एकमताने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सामृहीक पणे कार्य करण्याचे मत व्यक्त केले. यावेळी गावातील प्रत्येक घरातील तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा सर्व तरुणांनी आपल्या घरातील जेष्ठ सदस्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे त्यांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगावे गावातील ज्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांचे अनुभव त्यांना सांगीतला तर नागरिक कोरोना लस नक्की घेईल असे मत सरपंच सरपंच राजुभाऊ मंगेकर यांनी व्यक्त केले.