व्हिडिओ काॅन्फरंन्सींग बैठकांवर निर्बंध घाला: आ. सुभाष धोटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.

बैठकात गुंतल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळताना अडचणी.

चंद्रपूर जिल्हातील शासकिय रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन व औषधांचा मुबलक पूरवठा करण्यात यावा.
व्हिडिओ काॅन्फरंन्सींग बैठकांवर निर्बंध घाला: आ. सुभाष धोटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा:- राज्यात कोरोनाची विदारक परीस्थिती निर्माण होत असतांना मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मंत्री महोदय, सचिव, आयुक्त अशा विविध स्तरांवरील व्हिडिओ काॅन्फरंन्सींग व्दारा आयोजित बैठकांमध्ये गुंतलेले असल्याने स्थानिक पातळीवर काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना अडचणी निर्माण होत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माहिती जाणुन घेणेसाठी वरीष्ठ अधिकारी यांनी आॅफीस बाहेर निघून ग्रामीण भागत फिरल्या शिवाय स्थानिक परिस्थिती माहित होणार नाही. जिल्हयातील अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ काॅन्फरंन्सींग मध्ये अधिक वेळ जात असल्याने त्यांना परिस्थिती आटोक्यात आणने सुध्दा कठीण जात आहे.
तेव्हा सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन व्हिडिओ काॅन्फरंन्सींग बैठका कमी करून जिल्हयातील अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात फिरणेसाठी वेळ देण्यात यावी जेणेकरून येथे निर्माण झालेली भयानक परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here