आकाश अग्रवाल व कैलास अग्रवाल यांच्या कडून जिह्ल्याला मिळणार 200 ऑक्सिजन सिलेंडर.

✒मनोज खोब्रागडे✒
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (देसाईगंज):- येथील प्रसिध्द उद्योग पती तथा युवा समाजसेवक आकाश अग्रवाल व उद्योगपती कैलास अग्रवाल यांनी गडचिरोली जिह्ल्यातील रुग्णालयात होत असलेली ऑक्सिजन ची कमतरता पाहून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन गडचिरोली यांना 200 खाली सिलेंडर जिल्हा शल्यचिकित्सक यांना मागवून ते भरून आणून देण्याकरिता पुढाकार घेऊन जिल्हात होत असलेली ऑक्सिजनची कमी भरून काढण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही अग्रवाल बंधूंचे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने त्यांच्या समाजकारणाचे कौतुक केल्या जात असून त्यांच्या प्रमाणेच इतरांनी सुध्दा आरोग्य सेवेत आपले योगदान दिल्यास जिल्हात होत असलेली कमी पूर्ण करण्यास मदत होईल… विशेष म्हणजे 200 भरलेले सिलेंडर नागपुर वरून निघाले असून आज रात्रौला गडचिरोली येथे पोहचणार आहेत.अशी माहिती आम्हच्या प्रतिनिला मिळाली आहे.