यवतमाळ जिल्हात दारूची तलप भागविण्यासाठी पीले सॅनेटायझर्स; 7 जणांचा मृत्यू.
यवतमाळ जिल्हात दारूची तलप भागविण्यासाठी पीले सॅनेटायझर्स; 7 जणांचा मृत्यू.

यवतमाळ जिल्हात दारूची तलप भागविण्यासाठी पीले सॅनेटायझर्स; 7 जणांचा मृत्यू.

 

यवतमाळ जिल्हात दारूची तलप भागविण्यासाठी पीले सॅनेटायझर्स; 7 जणांचा मृत्यू.
यवतमाळ जिल्हात दारूची तलप भागविण्यासाठी पीले सॅनेटायझर्स; 7 जणांचा मृत्यू.

✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒              
यवतमाळ,दि.25 एप्रिल:- यवतमाळ जिल्हात मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत असल्याने कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने लॉकडाऊन लावण्यात आले असून त्या अंतर्गत इतर सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठानांसोबतच दारूची दुकानही बंद आहे. जिल्ह्यात दारूची अधिकृत दुकानें बंद असल्याने तळीरामांची तहान भागविण्याकरिता अवैध व्यावसायी चौपट दराने दारूची विक्री करत आहे. त्यामुळे अनेकांना ही दारू विकत घेणे अशक्यप्राप्त ठरत आहे 30 मिली सॅनेटायझरची नशा एका निप एवढी मिळते. असा खोटा प्रचारही याबाबत होत आहे.

दारूच्या नशेकरिता सॅनेटायझर दारू महाग मिळत असल्याने व ती परवडण्यासारखी नसल्याने अनेकांनी दारू ऐवजी सॅनेटायझर्स पिले. दत्ता कवडू लांजेवार वय 47 वर्ष रा. तेली फैल वणी,  नूतन देवराव पाटणकर रा. रुग्णालयजवळ वणी, संतोष उर्फ बालू मेहर वय 35 रा एकतानगर, विजय बावणे रा. वणी अशी मृतांची नावे आहेत शुक्रवारी संध्याकाळी सुनील महादेव ढेंगळे व गणेश उत्तम शेलार या दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही वेळातच दत्ता लांजेवार याचा मृत्यू झाला तर पहाटे आणखी तिघांचा घरीच पहाटे मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तींनी सोबतच नशा केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या 24 तासांन मध्ये सहा व्यक्तींचा मृत्यू झाल्याने यवतमाळ जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीवरून दत्ता लांजेवार, नूतन बालू, विजय बावणे, सुनील ढेंगळे, गणेश शेलार व दत्ता लांजेवार यांना ग्रामीण रुग्णालययात दाखल करण्यात आले मात्र काही वेळातच संध्याकाळी मृत्यू झाला. नूतन देवराव पाटणकर याला अस्वस्थ वाटल्याने तो ग्रामीण रुग्णालययात उपचारासाठी गेला होता मात्र तिथून तो उपचार न घेताच निघून आला. त्याचा पहाटे मृत्यू झाला. संतोष उर्फ बालू मेहर 35 व विजय बावणे हे मजुरी करायचे. बालू हा पुण्यात मजुरीचे  काम करायचा. मात्र दोन तीन वर्षाआधी तो वणीत परत आला. बालू याचा पहाटे साडेतीन वाजताच्या  सुमारास मृत्यू झाला. तर विजयचा देखील रात्रीच घरी मृत्यू झाला. सुनिल ढेंगळे, आणि दत्ता लांजेवार, यांच्या मृत्यूदेहाचे शवविछेदन सुरु होते. या दोघांचा मृत्यू सॅनेटायझर प्राशन केल्याने झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here