महाडमध्ये गारांसह जोरदार वादळी पाऊस.

महाडमध्ये गारांसह जोरदार वादळी पाऊस.

महाडमध्ये गारांसह जोरदार वादळी पाऊस.

✍रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : महाड तालुक्यात गेली कांही दिवस पावसाचे चिन्ह दिसून येत होते. बदललेल्या तापमानामुळे सोमवारी सायंकाळी अचानक ढग दाटून येवून तालुक्यातीत विजांच्या गड गडासह गारांचा जोरदार पाऊस बरसला यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना कांहीसा दिलासा मिळाला आहेत तर या पावसामुळे वीट भट्टी व्यवसायिक व आंबा पिकाच मोठ नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
शुक्रवारी सुद्धा तालुक्याच्या कांही भागात वादळी वाऱ्याने नुकसान केले. या वादळी वाऱ्यामुळे शहराजवळ असलेल्या शिरगाव आदिवासीवाडी येथे एका घराची भिंत कोसळली.
महाड तालुक्यात गेली कांही दिवस सातत्याने बदलणाऱ्या तापमानामुळे मानवी जीवन हैराण झाले आहे.
सध्या हवेतील उष्मा वाढतच असल्याने त्याचे सतत वादळी पावसात रुपांतर होत आहे सोमवारी सांयकाळी विजांच्या आणि ढगाच्या जोरदार वादळी वारा आणि पाऊस आल्याने अनेकांची पळापळ झाली.ऐन लग्नसराई सुरु असल्याने अनेकांचे लग्न मंडप आणि समारं भावर याचा विपरित परिणाम झाला
या पावसामुळे आणि वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या सार्वजनिक, सांस्कृतिक आणि लग्न सोहळे आटोपते घ्यावे लागले. या वादळी पावसामुळे आंबा, करवंद, आदी रानटी फळे धोक्यात आली आहेत. पडलेल्या पावसामुळे दुसऱ्या दिवशी वातवरण देखील चांगलेच तापले आहे. वाढलेल्या उष्म्याने देखील नागरिक हैराण झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here