चंद्रपुरात शिक्षकी पेशाला काळीमा, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

112

चंद्रपुरात शिक्षकी पेशाला काळीमा, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मीडिया वार्ता वृत्तसेवा

मो:8830857351

चंद्रपूर, 24 एप्रिल:चंद्रपूर तालुक्यातील पद्मापूर जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकावर दुर्गापूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुरूवार, 24 एप्रिल रोजी करण्यात आली. इंद्रजीत रायपुरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

महानगरालगतच्या दुर्गापूर येथून जवळच असलेल्या पद्मापूर येथील काही विद्यार्थी पद्मापूर जिल्हा परिषद शाळेत ज्ञानार्जनाचे धडे गिरवतात. याच शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. पिडितेसह अन्य काही विद्यार्थिनींसह त्या शिक्षकाने अश्लील चाळे केल्याची तक्रार पिडितेसह तिच्या आईने दुर्गापूर पोलिस ठाण्यात नोंदवली. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी 354, अ, (1), पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या ठाणेदार लता वाढीवे यांनी दिली.