सुरत मधील लोकशाहीच्या हत्येप्रकरणी राष्ट्रपतींनी त्वरित दखल घ्यावी-भूमिपुत्र ब्रिगेड
• भूमिपुत्र ब्रिगेड तर्फे महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 25 एप्रिल
26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक स्थापन झाले आणि संविधानिक मार्गाने आपले सरकार निवडण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला पण गेल्या काही वर्षांमध्ये संविधानिक मार्गाने होणाऱ्या निवडणुका आणि सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही लोकशाही विरोधी लोकांकडून आणि पक्षांकडून लोकशाहीची हत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.
चंदिगड मध्ये भाजपा दर्जिन्या निवडणूक अधिकाऱ्याने केलेला प्रकार सर्वश्रुतच आहे आणि त्यांनी चंदीगड ची घटना ताजी असतानाच सुरत मध्ये भाजपा उमेदवाराच्या विरोधातील सर्व उमेदवारांची उमेदवारी अर्ज एक तर बाद करणे किंवा त्यांना साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करून मागे घ्यायला लावणे आणि भाजपच्या उमेदवाराला अविरोध विजयी घोषित करणे ही लोकशाहीची हत्याच होय.या प्रकरणांमध्ये भाजपाच्या बिनविरोध विजयासाठी काँग्रेस उमेदवार निलेश कुंभाणी यांनीच भाजपाशी हात मिळवणी केली आणि त्यांनी प्रदेश काँग्रेसला अंधारात ठेवून भाजपाशी युती केली. आपला उमेदवारी अर्ज त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांऐवजी नातेवाईकांना, निकटवर्तीयांना अनुमोदक म्हणून ठेवले आपल्या डमी उमेदवाराच्या अर्जावर सुद्धा असेच अनुमोदक त्यांनी ठेवले आणि नंतर त्या सह्या बनावट असल्याचा बनाव करून तसेच शपथपत्र देऊन सर्वजण भूमिगत झाले. हे सर्व एका सुनियोजित योजनेमार्फत घडवून आणण्यात आले.
हे सर्व घडल्यावर सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घाईघाईने त्या उमेदवाराला विजयी घोषित केले जेव्हा की ईव्हीएम मशीनवर भाजपाचे उमेदवार आणि नोटा चा पर्याय उपलब्ध आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने या दोघांच्या मध्ये लढत घ्यायला पाहिजे होती ज्याच्याने मतदारांमध्ये भाजपाच्या समर्थनामध्ये किंवा भाजपाच्या विरोधामध्ये मतदान करण्याची संधी उपलब्ध झाली असती. आणि जर नोटाला अधिक मतदान पडले तर ती निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा घेता येईल पण निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्ष यांच्यामधील शॉर्ट गट च्या माध्यमातून देशातील जनमत भाजपाच्या बाजूने कसे करता येईल या उद्देशानेच हा भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचा एकतर्फी निर्णय जाहीर करण्यात आला हे अतिशय निषधारह आहे आणि म्हणून आमची महामहीम राष्ट्रपती यांना विनंती आहे की त्यांनी या लोकशाही विरोधी घटतेची त्वरित दखल घेऊन सुरत येथे मतदान घेऊन देशातील लोकशाही आणि संविधान यांचे संवर्धन करावे.
यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडचे डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे, प्रांतअध्यक्ष डॉ. समीर कदम, जिल्हाध्यक्ष हेमंत भगत, संघटक एडवोकेट प्रशांत सोनुले, डॉ. राजु ताटेवार, प्रवक्ता विजय मुसळे, डॉ. राकेश वनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.