दिशा फाउंडेशन सेंटर वाई यांनी आयोजित केलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उद्घघाटन.
✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 ८९८३२४८०४८ 📞
माणगाव : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांची तयारी ही पायाभूत असेल तर विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा परीक्षेस आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो. याच शैक्षणिक मूल्याची जोपासना करण्यासाठी ‘दिशा फाउंडेशन सेंटर, वाई’ येथे विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीचे योग्य नियोजन करीत, इयत्ता ७ वी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना JEE / NEET तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या पायाभूत घटकांचा परिचय हा कृतिशील अध्ययनाच्या माध्यमातून करता यावा म्हणून ४५ दिवसीय उन्हाळी शिबिराचे नियोजन करण्यात आले. यासाठी सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी ‘स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्राम’ आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेसंदर्भात असणारे समज , गैरसमज तसेच इयत्ता ७ वी पासून स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत करण्याच्या महत्त्वपूर्ण कौशल्यांच्या संदर्भात विशेष माहितीचे आयोजन हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमन एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक माननीय प्रा. डॉ. नितीन कदम सर आणि संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रा. सौ रुपाली कदम मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात विभाग प्रमुख प्रा. सुशील कुमार यांनी प्रास्ताविक व परिचय विविध पीपीटीं द्वारे विद्यार्थ्यांना करवून दिला. प्रा. डॉ. नितीन कदम सर यांनी विद्यार्थ्यांनी रोजच्या दैनंदिन गोष्टींमध्ये विज्ञानाचा शोध घेतला पाहिजे का ? या प्रश्नांचे पाठपुरावे विद्यार्थ्यांनी घेतल्यास विद्यार्थ्यांमधूनच एक नवा वैज्ञानिक घडू शकेल असे व्यक्त केले. यामध्ये पालकांचा सहभाग हा देखील महत्त्वाचा असणार आहे असे आवाहन पालकांना केले.
प्रा. रूपाली कदम मॅडम यांनी दहावीनंतर मुलांना सामोरे जावे लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी फाउंडेशन कसे उपयुक्त असणार आहे याबाबत माहिती दिली. सौ. अपर्णा शिंदे यांनी दिशाच्या वेगवेगळ्या विभागांची तसेच त्याद्वारे चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.