डोंबिवली मध्ये पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध..,…

डोंबिवली मध्ये पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध..,…

हिरामण गोरेगावकर
8689818225
कल्याण डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवली :- दि . 25 एप्रिल 2025डोंबिवली मध्ये आखिल भारतीय बैल गाडा संघटना (सल्लग्न ) बैल प्रेमी सेवाभावी संस्था व जय पिंपळा देवी प्रसन्न मानपाडा व ग्रामस्थ मंडळ मानपाडा यांच्या वतीने यांच्या वतीने पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध..

आज शुक्रवार दि . 25 रोजी डोंबिवली मध्ये आखिल भारतीय बैल गाडा संघटना, बैल प्रेमी सेवाभावी संस्था तसेच जय पिंपलादेवी प्रसन्न मानपाडा आणि ग्रामस्थ मंडळ मानपाडा यांच्या वतीने पाहेलगाम येथे झालेल्या भ्याड हलल्याचा निषेध करण्यात आला सध्या देशात अनेक ठिकाणी कुठे ना कुठे अतिरेकी संघटना अशा प्रकारे भ्याड हल्ले करत आहेत दोन दिवसा पूर्वी सुद्धा काश्मीर मधील पहेलगाम येथे असाच हल्ला अतिरेक्याकडून करण्यात आला आणि पर्यटन आनंद घेण्यासाठी गेलेल्या 30 निष्पाप नागरिकांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला यात डोंबिवली येथील तीन मावस भाऊ मारले गेले भारत सरकार सरकार कडून यावर कठोर पावले उचल्यात येत आहेत पण देशात अनेक ठिकाणी अनेक संस्था कडून अशा हल्ल्याचे निषेध व्यक्त केले जात आहेत अशाच प्रकारे डोंबिवली मध्ये सुद्धा आज सकाळी बैलाच्या अंगावर पाकिस्तान मुर्दाबाद लिहून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.