खर्रा विक्रेत्यांवर केली कारवाई .
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर
मो 9096817953
भिवापूर. भिवापूर शहरातील बसस्थानक परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करित प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ विकणाऱ्या तिघांविरुद्ध कडक कारवाई केली या कारवाईमुळे परिसरतिल खर्रा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे पोलिस उपनिरीक्षक सुरेखा बिडगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान भोलेशंकर पुरुषोत्तम फटे वय २५ वर्षे तास कॉलनी, अमित उत्तम मोटघरे २६ वर्षे इंदिरानगर, नितीन आसाराम चौधरी दिघोरा या तिघांकडून मोठ्या प्रमाणात तंबाखू, सुंगधीत सुपारी आणि सिगारेट जप्त करण्यात आल्या. या तिंघाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेतपोलिसांच्या या कारवाईमुळे खर्रा विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा प्रकारच्या कारवायांमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या वस्तूंच्या विक्रेत्यांवर अंकुश येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.