गोगाव नजीक अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात दोघांचा मृत्यू.

🖋मनोज खोब्रागडे🖋
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या गोगाव नजीक अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन वाहन चालक स्वप्निल मशाखेत्री रा. लाझेंडा हा जागीच ठार झाला.तर महेश उसेंडी रा.रांगी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल 23 मे रोजी रात्रोच्या सुमारास घडली.
काल 23मे रोजी रात्रौ उशिरा स्वप्निल मशाखेत्री व महेश उसेंडी हे आरमोरी मार्गे गडचिरोली येथे अवैध दारुची वाहतूक मारुती सुझुकी या चारचाकी वाहनाने करीत होते.दरम्यान गोगाव नजीक वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जबर ठोकर बसून अपघात झाला.यात वाहन चालक स्वप्निल मशाखेत्री रा. लाझेंडा हा जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती गडचिरोली पोलीस ठाण्याला माहीत होताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले व जखमी महेश उसेंडी रा.रांगी याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर अपघातग्रस्त वाहनातून 1 लाख 80 हजार रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल मिळून आला. पुढील तपास गडचिरोली पोलीस ठाण्याचे पो.उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहेत.