महानगर गॅस लिमिटेड मुंबई सी एस आर योजनेंतर्गत दिव्यांगांसाठी महाड येथे सहाय्यक उपकरणे मोफत वाटप शिबीर संपन्न
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):- श्री समर्थ कल्याणकारी संस्थेने दि.6 ते 8 फेब्रुवारी रोजी दिव्यांग व्यक्तींना गरजू साहित्य बाबत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सहभागी दिव्यांगांना व्यक्तीचे मोजमाप घेऊन त्यांना आवश्यक अशी साधने महानगर गॅस आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आल्मिको मुंबई या कंपनी तर्फे उपलब्ध करून देण्यात आली या साहित्य व साधनाचे वाटप कार्यक्रम 25 मे 2022 रोजी माता रमाई विहार क्रांती स्तंभ महाड येथे महानगर परिषद आणि श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या वतीने राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी श्रीमती दीप्ती शेडगे, अनिल जाधव, मुबीन देशमूख, यांनी खूप मेहनत घेतली