एक हात मदतीचा
४२लाभार्थ्यांना:५टक्के दिव्यांग निधीचे तर अनुसूचित जात जमाती ला१०व१५टके निधी चे वितरण
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड –तालुक्यातील सावरगांव ग्रामपंचयत च्या वतीने अस्थिव्यंग,कर्णबधिर,अल्पदृष्टी ई. पात्र दिव्यांग बांधवाना पाच टक्के निधीतून फायबर खुर्चीचे ४२लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले तर १० व १५टक्के निधीतून अनुसूचित जातीजमाती च्या समाजाला विविध वस्तूचे वाटप करण्यात आले.
या वितरण कार्यक्रम ग्राम पंचायत सावरगांव येथिल सरपंच मा.रवींद्रजी निकुरे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्त्यांना खुर्चीचे वितरण करण्यात आले तसेच सचिव यम.आर.भडके,ग्रा.प.सदस्य सौ ,कविता राऊत,प्रा.युवराज रामटेके,शिवशंकर सहारे,जयंत निकुरे,राजेश बारसागडे अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ तळोधी ,सौ ,आशा गेडाम,सौ,विमल राऊत ई. च्या हस्ते दिव्यांग बांधव व अनुसूचित जाती जमातीच्या समाजाला आलमारी.गॅस शेगडी,स्टील बॅकेट, जर्मन गंज,भोजन पट्या, घंटा,नगारा, फायबर प्लेट,बफे टेबल,स्पिकर,दर्याआदी समाज उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.
या वितरण कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता लिपिक लोकनाथ राऊत,कॅम्पूटर ऑपरेटर नाना निकुरे,पंम्प ऑपरेटर दिवाकर नेवारे व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी आदी चे सहकार्य लाभले,या वितरण कार्यक्रमाला दिव्यांग लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.