मासेमारी साठी गेलेल्या आमशेत येथील शेंदूर डोहात प्रकाश चव्हाण यांचा बुडून मृत्यू

मासेमारी साठी गेलेल्या आमशेत येथील शेंदूर डोहात प्रकाश चव्हाण यांचा बुडून मृत्यू

मासेमारी साठी गेलेल्या आमशेत येथील शेंदूर डोहात प्रकाश चव्हाण यांचा बुडून मृत्यू

किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):-मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रकाश चव्हाण वय 62 व आमशेत येथील काही ग्रामस्थ शेंदूर डोह आमशेत येथे मासेमारी करण्यासाठी गेले होते. प्रकाश चव्हाण हे मूळ आमशेत येथील रहिवासी असून शेती हा त्यांचा व्यवसाय होता पूर्वीपासूनच मासेमारीचा छंद असल्यामुळे नेहमी प्रमाणे काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास काही ग्रामस्थ व प्रकाश चव्हाण हे मासेमारीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रकाश चव्हाण यांच्या मृत्यूमुळे चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सदर घटनेची बातमी महाड एमआयडीसी पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच साळुंखे रेस्कु टीम अध्यक्ष प्रशांत साळुंखे व त्यांची संपूर्ण टीम यांनी सकाळी आठ वाजल्यापासून डोहात बुडालेल्या प्रकाश चव्हाण यांचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र अखेर तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर प्रकाश चव्हाण यांचा मृत्यू देह शेंदूर डोह येथे सापडला. काल रात्री पासून प्रकाश चव्हाण हे घरी न आल्यामुळे पाण्यात बुडाल्याचा अंदाज ग्रामस्थांना आला यामुळे सर्व ग्रामस्थ रात्रभर प्रकाश चव्हाण यांचा शोध घेत होते. प्रकाश चव्हाण यांच्या मृत्यू देहा सोबत मासेमारी करण्यासाठी आणलेले जाळे सापडले. प्रकाश चव्हाण यांचे कपडे व काठी डोहाच्या किनाऱ्यावर सापडल्याने ते पाण्यातच बुडले असावेत असा संशय ग्रामस्थांना आल्यामुळे त्यांचा शोध सुरू झाला या संपूर्ण घटनेची महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गोरेगावकर हे करीत आहेत.