रेश्मा गरुडे हिच्या हत्ये प्रकरणी खांदेश्वर पोलीस करणार लवकरच मुख्य आरोपीला गजाआड

रेश्मा गरुडे हिच्या हत्ये प्रकरणी खांदेश्वर पोलीस करणार लवकरच मुख्य आरोपीला गजाआड

रेश्मा गरुडे हिच्या हत्ये प्रकरणी खांदेश्वर पोलीस करणार लवकरच मुख्य आरोपीला गजाआड

संतोष आमले
पनवेल तालुका /प्रतिनिधी
9220403509

पनवेल तालुक्यातील खांदेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील आदई गावात एका ३३ वर्षीय महिला रेश्मा सचिन गरुडे यांना जबरी मारहाण करून त्यांची हत्या झाल्याचे २२ मे २०२२ रोजी उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीसांचा तपास चोहोबाजूने सुरु असल्याने लवकरच या गुन्ह्यातील आरोपीला गजाआड करतील असा विश्वास पोलीस सूत्रांकडून देण्यात येत आहे.
आदई गावातील एका बांधकाम सुरु असलेल्या ४ मजली इमारतीच्या टेरेसवर रेश्मा गरुडे यांचा मृतदेह सापडला आहे. रेश्मा गरुडे यांच्या हत्येचे नेमके कारण कोणते हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, पोलीस तपासाअंती हत्येचे कारण लवकरच उघडकीस येईल असा अंदाज आहे. रेश्मा गरुडे यांच्याबद्दल अधिक तपास खांदेश्वर पोलीस स्टेशन मार्फत सुरु असून रेश्मा गरुडे यांना हत्येपूर्वी जबर मारहाण झाली असल्याने या प्रकरणाचे गूढ कायम आहे.परंतु पोलिसांनी त्या परिसरात केलेल्या अधिक चोकशी अंती काही व्यक्ती पोलिसांच्या रडारवर असून काहींना चोकशी साठी ताब्यात घेतल्याचे समजते आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील विविध पथके ठिकठिकाणी रवाना झाली असून , लवकरच मुख्य आरोपी पोलिसाच्या ताब्यात असेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे .
फोटो – रेश्मा गरुडे