या कलियुगात माणूसकी विसरले लोक – मा. किशोर बावणे !
निर्वस्त्र वयोवृद्धाला अंतिम कापड देत फ्रिडमची श्रद्धांजली !
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞
भंडारा : (साकोली ) भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात एक वयोवृद्ध साकोली न्यायालयातील गेटसमोरच मृत अवस्थेत पडले होते. तेथून ये जा करणारे लोकही वाकड्या तोंडाने तोंडावर रूमाल ठेवून पाहून न पाहिल्या सारखे करीत निघून जात होते. हे आजच्या कलियुगातील महान नागरिक आहेत. की ज्यांनी माणूसकी विसरून असा अमानूषपणा या दूनियेत दाखवित आहेत. पण ते दृष्य फ्रिडमला पहाविसे वाटले नाही. आणि निर्वस्त्र असलेल्या वयोवृद्धाच्या अंगावर कापड घालण्याचे सौभाग्य फ्रिडम युथ फाउंडेशन अध्यक्ष मा. किशोर बावणे यांनी माणूसकी कमविली आहे.
ही घटना शुक्रवार दिनांक २४ मे २०२४ रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास साकोली न्यायालयाच्या गेटसमोरच अनोळखी मृतक वयोवृद्ध पडले होते. तेथून शेकडो नागरिक, न्यायालयातील वकील मंडळी ये जा करीत होते पण थोडे थांबून ही व्यक्ती कोण.? याची माहिती पोलिसांना किंवा रूग्णालयाला आहे काय.? यात आपले तर कुणी परीचीत हे वृध्द नाहीत.? हे दोन सेकंदही थांबून विचारण्याचे धाडस व हिंमत या कलियुगातील मानवाने दाखविले नाही. तर यालाच म्हणतात कलियुगातील असे काही मतलबी अमानुष.
पण तेथून फ्रिडमचे किशोर बावणे जातांना हे दृष्य पाहताच त्यांचे मन हळहळले आणि तातडीने एक नविन कापड आणून त्या मृत शरीरावर ओढले. तातडीने पोलीस नायक नवनीत जांभूळकर यांना ही कल्पना दिली. त्यांनी किशोर बावणे यांच्या मदतीने ते अनोळखी वयोवृद्धाचे शव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणून या कलियुगात दोघांनी एक माणूसकीचा परीचय दिला आहे. आणि एक अनोळखी वृद्धाच्या अंतीम क्षणाला त्यांवर वस्त्र परिधान करण्याचेही सौभाग्य प्राप्त केले हे खास स्तुतीमय आहे.
पोलीस नायक नवनीत जांभूळकर यांनी साकोली मिडीयाच्या समुहातून सदर वयोवृध्द नागरीकाची ओळख पटविण्यासाठी सदर इसम हे अंदाजे ७० वर्षाचे असून फोटोमधील वर्णन पाहून साकोली पोलीस हेल्पलाईन ०७१८६ – २३६१३३ यावर त्यांचा कुटुंबीयांनी अथवा परीचीतांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.