बामणघर येथे तथागत भगवान बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
किशोर पितळे- तळा तालुका प्रतिनीधी ९०२८५५८५२९
तळा -शांती व क्रांतीचे प्रणेते भगवान गौतम बुद्ध व भारतीय संविधानाचे शिल्पकार,क्रांतीचेजनक, विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती भीम प्रेरणा विकास मंडळ व आदर्श माता रमाई महिला मंडळ, बामणघर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार, दि. २३ मे, २०२४ (बुद्ध पौर्णिमा) रोजी मा. आयु. लक्ष्मण दगडू गायकवाड (अध्यक्ष , भीम प्रेरणा विकास मंडळ, बामणघर) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम विश्वशांती बुद्धविहार, बामणघर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी १०.वाजता समता सैनिक दलाचे जवान व उपस्थित भीम अनुयायी यांच्या वतीने धम्मध्वजाला व महामानवाला मानवंदना देण्यात आली. यानंतर कार्यक्रमस्थळी मानव आदर्शांच्या प्रतिमाचे पुष्पपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.बुद्ध पूजापाठ मंडळाचे सरचिटणीस ऍड. प्रकाश गायकवाड व उपस्थित सर्व उपासक,उपासिका यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.कु.संबोधी सिद्धार्थ सकपाळ हिने बुद्धगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. आयु. दत्ताराम सोनवणे हे १६ वर्षानंतर अमेरिकेहून मायदेशी परतल्यामुळे दोन्ही मंडळाच्या वतीने त्यांना व त्यांच्या पत्नीस शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच कु. गौतमी रघुनाथ सकपाळ ही १२ वी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचादेखील दोन्ही मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. यानंतर शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपल्या गीतातून तथागत बुद्ध व महामानवाला गीतांजली वाहिली. तसेच दत्ताराम सोनवणे, अशोक गायकवाड, प्रदिप गायकवाड आदी सभासदांनीआपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.दुपारी सर्वांना भोजनदान करण्यात आले. दुपारी ०३.३० ते ०६.३० या वेळेत कार्यक्रम स्थळ ते संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भीम अनुयायांनी खालूबाजावर चांगलाच ठेका धरला होता. लेझीम, बाणा बनाठी सादर करत तरुणाईने भीम जल्लोष साजरा केला. यादरम्यान आयु. विजय जाधव व आयु. संतोष नाक्ते यांनी जयंती कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा दोन्ही मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संध्याकाळी ७.३० ते ०९.३० या वेळेत महिला, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचेसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर सर्वांना पुन्हा एकदा भोजनदानकरण्यात आले.रात्री १.३० वाजता तथागत बुद्ध वमहामानवाला अभिवादन करण्यासाठी बुद्ध – भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बुद्ध भीम गीतांचा सुरेल संगम साधण्यात आला. शेवटी सर्वांच्या उपस्थितीत सरणत्तय घेण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ, महिला व नवतरुण मंडळाने तन-मन-धनाने सहकार्य केले. या कार्यक्रमास दोन्ही मंडळाचे सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी , समता सैनिक दलाचे जवान, पाहुणे मंडळी व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. प्रकाश गायकवाड केले. तर आभार आयु. प्रदिप सकपाळ यांनी मानले.