चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तरुणाने अखेर यश खेचून आणले अन् हिणवणाऱ्यांनीच अभिनंदनाचे बॅनर लावून अभिनंदन दिले !

चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तरुणाने अखेर यश खेचून आणले

अन् हिणवणाऱ्यांनीच अभिनंदनाचे बॅनर लावून अभिनंदन दिले !

चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तरुणाने अखेर यश खेचून आणले अन् हिणवणाऱ्यांनीच अभिनंदनाचे बॅनर लावून अभिनंदन दिले !

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : आयुष्याच्या प्रवासात लाख संकट येत असतात. मात्र, जे या संकटांवर मात करून ठामपणे उभे ठाकतात, विजयश्री अशाच्याच गळ्यात विजयाची माळ घालत असते. याचाच प्रत्यय आलाय तो भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे. चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या एका तरुणाने घरची परिस्थिती सांभाळून अखेर बारावीची परीक्षेत एकहाती यश खेचून आणले आहे. विशेष म्हणजे त्याच्या या यशाचा सर्वाधिक आनंद हा त्याच्या चहाच्या टपरीवर येणाऱ्या ग्राहकांना झाला आहे. कारण, या तरुणाने बोलून दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला असून बारावीत ५५% टक्के गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे त्याच्या अभिनंदनाच बॅनर या ग्राहकांनी त्यांचाच चहाच्या टपरीवर लावला असून ते सध्या साऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

*हिणवणाऱ्यांनीच लावला अभिनंदनाचे बॅनर*  

घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आई-वडीलही मोलमजुरी करतात. त्यांना हातभार लावता यावा म्हणून बारावीचे शिक्षण घेणारा पंकज चहाटपरीवर काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. बारावीच्या परीक्षेच्या दरम्यानही त्याने हे काम सोडले नाही. अशा वेळेस चहा पिण्यासाठी येणारे प्रत्येक ग्राहक त्याला अबे पंक्या, अभ्यास करं, नाहीतर नापास होशील आणि हेच धंदे करशील म्हणून बोलत होते. मात्र, पंकजने हे बोल मनावर घेतले. आणि चहा दुकानावरील काम नं सोडता अभ्यासही केला. आणि त्याने चक्क ५५% टक्के मार्क्स घेवून परीक्षा उत्तीर्ण केली. पंकजच्या यशाने जे टोचून बोलत होते, त्यांनीच आता पंकजच्या अभिनंदनाचा बॅनर लावून त्याचे अभिनंदन केले आहे.  

*घरची परिस्थिती सांभाळून घेतली यशाची गवसणी* 

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील तो रहिवाशी असलेला पंकज नरेश जेंगठे याच्या घरची परिस्थिती एकदम हलाखीची आहे. शिवाय त्याचे कुटुंब हे भूमिहीन आहे. त्यामुळे पंकजचे आई – वडील मोलमजुरी करतात. त्यांना आर्थिक मदत करता यावी आणि स्वतःच्या मिळकतीतून शिक्षण पूर्ण करता यावे, म्हणून पंकज हा स्वतः एका चहाच्या टपरीवर काम करून बारावीचे शिक्षण घेत होता. ही चहाची टपरी प्रसिद्ध आणि गावातील मुख्य चौकातील असल्याने इथे गावातील प्रसिद्ध व्यावसायिक, राजकारणी, पत्रकार आणि पंचक्रोशीतील जनता येत असे. त्यामुळें पंकज सर्वांचा चाहता बनला होता. 

*अन् पंक्या १२ वीच्या परीक्षेत प झाला पास*

बारावीच्या परीक्षा काळातही पंकज चहा टपरीवर काम करीत असल्याने चहा पिण्यासाठी येणारा प्रत्येकजण त्याला ‘अबे पंक्या, अभ्यास कर…कामाला येवू नकोस…नाहीतर नापास होशील आणि हेच काम करावे लागेल’ असं टोचून आणि उपहासात्मक पणे  बोलत होते. पंकजने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नं देता, नित्यनेमाने चहा टपरीवर काम करून परीक्षा दिली आणि पठ्ठ्याने चक्क ५५% टक्के मार्क्स घेवून बारावीची परीक्षा पास केली. पंकजला जे हिनवायचे त्यांनीच आज  त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून शहरातील मुख्य वर्दळीच्या चौकात अभिनंदनाचा बॅनर लावला. पंकजची आणि त्याच्या बॅनरची सध्या केवळ लाखांदुरातच नव्हे तर भंडारा जिल्ह्यात देखील चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here