मुलीच्या सासरी गेलेल्या बाबाची जावयाने केली गोळी झाडून हत्या.

55

मुलीच्या सासरी गेलेल्या बाबाची जावयाने केली गोळी झाडून हत्या.

मुलीच्या सासरी गेलेल्या बाबाची जावयाने केली गोळी झाडून हत्या.
मुलीच्या सासरी गेलेल्या बाबाची जावयाने केली गोळी झाडून हत्या.

✒️मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒️
अहेरी/गडचिरोली,दि.25 जुन:- गडचिरोली जिल्हतील अहेरी मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहेरी शहरातील धर्मपुरी वॉर्डात जावयाने स्वताःच्या सासऱ्यांची गोळी झाडून हत्या केली. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. मारोती मत्तामी राह. खोरडा, ता. चामोर्शी असे मृताचे सासऱ्यांचे तर मनोज गावडे असे जावयाचे नाव आहे. मनोज गावडे हा पोलिस दलात कार्यरत आहे. घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी मृत्युदेह उर्वरीत तपासणी साठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी मारोती मत्तामी हे अहेरी येथे आपल्या मुलीचा सासरी मुलीला भेटायला आले होते. मारोती मत्तामी यांच्या मुलगी व जावयात माघील काही दिवसापासून पारीवारिक विवाद सुरू होता. तो सोडविण्यासाठी मारोती मत्तामी अहेरी येथील धर्मपुरी वॉर्डात मनोज गावडे याच्या घरी आले होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास जावई आणि सासऱ्यात या विषयावरून वाद झाला आणि वाद विकोपास गेला. रागाच्या भरात मनोजने गोळ्या झाडल्या आणि सासऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

गोळ्यांचा आवाज येताच आजूबाजूचे लोक जागे झाले त्यांनी काय घडले याची माहिती घेतली असता जावयाने सासऱ्यावर गोळी झाडल्याचे समोर आले. लागलीच घटनेची माहिती अहेरी पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मनोज गावडे याला ताब्यात घेतले. घटनेचा पंचनामा गुरुवारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास अहेरी पोलिस करीत आहे.