अपुऱ्या पैशात घरकुल बांधायचे कसे…?* :वाळू साठी घरकुल धारकांना अवाजवी रक्कम *घरकुल धारकांना वाळू उपलब्ध करून देणारा “तो” जी.आर गायब …?*

47

*अपुऱ्या पैशात घरकुल बांधायचे कसे…?*

:वाळू साठी घरकुल धारकांना अवाजवी रक्कम

*घरकुल धारकांना वाळू उपलब्ध करून देणारा “तो” जी.आर गायब …?*

अपुऱ्या पैशात घरकुल बांधायचे कसे...?* :वाळू साठी घरकुल धारकांना अवाजवी रक्कम *घरकुल धारकांना वाळू उपलब्ध करून देणारा "तो" जी.आर गायब ...?*
अपुऱ्या पैशात घरकुल बांधायचे कसे…?*
:वाळू साठी घरकुल धारकांना अवाजवी रक्कम
*घरकुल धारकांना वाळू उपलब्ध करून देणारा “तो” जी.आर गायब …?*

ब्रम्हपूरी:
बेघर नागरिकांना हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी शासनाने घरकुल योजना राबवली आहे. मात्र प्रत्यक्ष घर बांधताना लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. घर बांधण्यासाठी मंजूर झालेल्या रक्कमेपैकी बरेच पैसे वाळू खरेदीत होत असल्याने . या परिस्थितीत सरकारी घरकुल पैशात घर बांधायचे की वाळुची खरेदी करायची..? असा सवाल घरकुल लाभार्थ्यांन कडून उपस्थित होत आहे.

प्रत्येक बेघर व्यक्तीचे हक्काचे घरकुलांचे स्वप्न साकार व्हावे, झोपडीत राहणार्‍या गोरगरिबांना पक्की घरे मिळावीत , यासाठी शासनाने घरकुल योजना काढली आहे. योजनेत समावेश झालेल्या लाभार्थ्यांना शहरी भागासाठी अडीच लाख रुपये तर ग्रामीण भागासाठी दीड लाख रुपये शासन देते. या पैशात सिमेंट ,वाळू, गिटी, लोखंड ,विटा ,खिडक्या, दरवाजे ,तार,खिळे आदी साहित्य लाभार्थ्यांना खरेदी करावे लागते. आजच्या काळात सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. यात वाळु घाट लिलाव बंद झाल्याने वाळू साठवणूक ठेवलेले ठेकेदार अव्वाच्या सव्वा दराने
वाळु विकत आहेत. घरकुल लाभार्थ्यांना सहज व सवलतीच्या दरात मिळण्यासाठी अशी कोणतीही योजना नाही. या परिस्थितीत घरकुल लाभार्थ्यांना तीन – चार हजार रुपये प्रति ब्रास या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. शासनाच्या नोंदीनुसार ब्रह्मपुरी शहरात तसेच तालुक्यात हजारो घरकुल मंजूर झालेले आहेत. यासाठी काही हप्ते देखील लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे.

वास्तविक पाहता घरकुल लाभार्थ्यांना मिळालेले बरेच पैसे केवळ वाळू खरेदी वर खर्च झाले आहेत. या परिस्थितीत शासनाने दिलेल्या पैशातून वाळु खरेदी करायची की घर बांधायचे? असा प्रश्न आता लाभार्थ्यांना पडला आहे. मध्यंतरी घरकुल लाभार्थ्यांना चार ब्रास वाळू महसूल प्रशासनाकडून उपलब्ध करून देणार असा जी.आर आला होता. तो जी आर कुठं गायब झाला…? या जी.आर ची कुठेही अंबलबजावणी झालेली दिसत नाही. यामुळे घरकुल लाभार्थ्यांची मोठी कुंचबणा होत आहे.वाळु व इतर साहित्याचे दर वाढल्याने त्यांना स्वपन्नातील घरकुल मृगजळ बनले आहे.महसुल विभागांनी प्रत्येक लाभार्थ्यांना चार ब्रास रेती मोफत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

*प्रतिक्रिया*

जप्त करण्यात आलेली वाळु घरकुल लाभार्थ्यांना सहज पणे देता येईल .पण पंचायत समिती स्तरावरुन घरकुल लाभार्थ्यांची यादी मागवुन जो जप्त साठा उपलब्ध आहे .त्या प्रमाणात क्रंमाक नुसार घरकुल लाभार्थ्यांना प्रतेकी पाच ब्रास वाळू देता येईल….

श्री विजय पवार
तहसीलदार, ब्रम्हपूरी

जप्त केलेली वाळू घरकुल लाभार्थ्यांना द्यावी
ब्रह्मपुरी तालुक्यात प्रशासनाच्या कारवाईत अनेक ठिकाणी वाळू जप्त करण्यात आलेली आहे घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या दरात विक्री केल्यास शासनाच्या आणि घरकुल लाभार्थ्यांना स्वप्नातील घर बांधता येईल. त्यामुळे प्रशासनाने जप्त केलेली वाळू घरकुल लाभार्थ्यांना द्यावी .अशी मागणी पंचायत समिती सदस्या उर्मिला धोटे यांनी केली.