*राज्य शासनाच्या नाकर्तेपणा मुळेच ओबीसींचे आरक्षण गेले…*
*माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्रपरिषदेत आरोप.*
*२६ जूनला भाजपाचा राज्यव्यापी रास्ता रोको.*

*माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्रपरिषदेत आरोप.*
*२६ जूनला भाजपाचा राज्यव्यापी रास्ता रोको.*
त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
चिमूर (चंद्रपूर ): -यापूर्वी माजी मुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचे आरक्षण कायम राखण्यासाठी अध्यादेश काढून संरक्षण दिले आणि न्यायालयासमोर बाजू मांडली.या अध्यादेशाला पुन्हा मुदतवाढ देऊन त्याचे कायद्यात रूपांतरण केले असते तर आरक्षण कायम राहिले असते.परंतु या सरकारने काहीही केले नाही.हे आरक्षण रद्द होणे हा ,राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा परिमाण आहे.न्यायालयाने ओबीसींना आरक्षण देण्यासाठी,मार्गदर्शक सूचना केल्या, पण त्याचेही पालन झाले नाही.यावरून या सरकारला आरक्षण द्यायचे नाही हे सिद्ध होते.म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी व ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी २६ जून,शनिवार ला राज्यात १००० जागी रास्ता रोको आंदोलन करेल,अशी माहिती माजी ऊर्जा मंत्री,भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपुर येथे गुरुवार(23जून)ला दिली.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री,भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,जि प अध्यक्ष संध्याताई गुरनुले,माजी आ.अतुल देशकर,ऍड. संजय धोटे,सुदर्शन निमकर,भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, संजय गजपुरे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अविनाश पाल,विनोद शेरकी यांची प्रामुख्याने उपस्थिती.
बावनकुळे म्हणाले,ओबीसींचा मुद्दा राजकारणाचा विषय नाही.हा त्यांच्या हक्काचा विषय आहे.राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या सुचने प्रमाणे काम केले पाहिजे.ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करणे काहीच कठीण काम नाही.हा डेटा 3 महिन्यात तयार होऊ शकतो,पण शासन काहीच करत नाही.सत्तेत असणाऱ्यांनी आंदोलन करणे,मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्र्यांनी मौन बाळगणे.यावरून अनेक शंका उपस्थित होतात.
राज्य निवडणूक आयोगाने 85 जि प व 144 पंचायत समित्यांच्या निवडणूका जाहीर केल्या.राज्य निवडणूक आयोग राज्य शासनाच्या अखत्यारीतच येतो.मग निवडणूक जाहीर झाली कशी…?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.जनगणना चा या आरक्षणाशी काहीही संबंध नाही.राज्य शासनालाच हे आरक्षण देता येऊ शकते व निवडणूक पुढे ढकलता येऊ शकते,शासनाने न्यायालयात जावे असे ते म्हणाले.
राज्य सरकारने ओबीसींचा डेटा तयार करण्यास सुरुवात करावी,आरक्षण निश्चित करावे,मागासवर्ग आयोग स्थापन करावा अशी मागणी त्यांनी केली.जो पर्यंत ओबीसींची आरक्षणाची मागणी पूर्ण होत तो पर्यंत भाजपाचा लढा सुरू राहील,अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी देवराव भोंगळे यांनी आंदोलनाची माहिती देत,हे आंदोलन चंद्रपुर शहराच्या सीमेवरील सर्व जाम करून केले जाणार असल्याचे जाहीर केले.
पडोली येथे विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख,माजी अर्थमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात तर माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात वरोरा येथे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.