आज ४७ वर्षं पूर्ण झाली आणीबाणी ला, भारताच्या राजकीय इतिहासातील काळाकुट्ट दिवस 25 जून 1975
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,१९७५ मध्ये आजच्या दिवशी लागू करण्यात आलेली राष्ट्रीय आणीबाणी हा आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील काळोखाचा दिवस होता. मूलभूत अधिकारांचे निलंबन आणि विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकणे हा असंतोष दाबण्याचा आणि लोकशाही स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा स्पष्ट प्रयत्न होता. ज्यांनी हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहून आपली घटनात्मक मूल्ये धोक्यात येण्यापासून वाचवली आणि आपल्या लोकशाही मूल्यांचे रक्षण केले त्या सर्वांना मीडिया वार्ता न्यूज तर्फे आदरयुक्त प्रणाम.
आजच्याच दिवशी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती. तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली. २५ जून १९७५ पासून लागू करण्यात आलेली आणीबाणी २१ मार्च १९७७ रोजी संपुष्टात आली. आणीबाणीचा हा जवळपास २१ महिन्याचा कालावधी होता. त्यावेळी, इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले. ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना मानली जाते.
आणीबाणीचा काळाकुट्ट दिवस कधीही विसरता येणार नाही,या आणीबाणीच्या विरुद्ध आवाज उठवनाऱ्या प्रत्येक लढवय्या ला सलाम !..