माणगाव पोलीस ठाणे कडापूर गावच्या हद्दीत/ व्हेल माशांची तस्करी/महिलेसह पाच पुरुष आरोपी अटक
*एकुण ५,८२,००,०००/- मुद्देमाल*
✍🏿दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
मो , 9271723603
माणगाव पोलिसांची धडक कारवाई
आज दिनांक २५/०६/२०२२ रोजी १४.३० वाजताचे सुमारास पोनि श्री राजेंद्र पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, रायगड पावाड रोडला मौजे कडापुर गावचे हद्यीत केल माशाचे उलटीचं तस्करी होणार असल्याची माहीती मिळाल्याने मा. पोलीस अधिक्षक सो, श्री. अशोक दुधे, अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रविण पाटील माणगाव विभाग माणगांव, पोनि श्री. राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री नितीन मोहिते, सपोनि श्री. लहांगे, पोसई श्री. गायकवाड, पोसई श्री आघाव, सहा फौजदार जितेंद्र वाटवे, पोहवा / ७८६ प्रशांत पाटील, पोहवा / ७९३ दर्शन दोडकुलकर पोहवा / ७०९ कोळेकर, मपोना / १९४ धनावडे, मपोना / ६४ कॉजे, मपोना / ७६ जाधव, पोना / १६२४ मिलिं खिरीट, पोशि/ १९०५ रामनाथ डोईफोडे, पोशि/ १३६१ श्याम शिंदे, पोशि/ २२३८ शिवाजी मिसाळ पोशि/ २२३८ धोंडिबा गिते पोशि/ १९५१ गोविंद तलवारे, पोशि/ ३९९ माटे, पोशि/ ४९९ पौधे, वनरक्षक अक्षर मोरे असे सदर ठिकाणी रवाना होवुन सदर ठिकाणी जावुन सापळा रचला. १५.३० वाजण्याचे सुमारास त्याठिकाणी एक इसम एका पांढ-या रंगाचे कार जवळ असलेल्या झाडाजवळ अर्धवट रेनकोट घातलेल संशयास्पद स्थितीत त्याचेकडे असलेला प्लस्टीकची गोणी लपवित असताना मिळुन आला. त्यास आमचेपैक पोना / १६२४ खिरीट यांनी जागीच पकडुन त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या प्लॅस्टीकच्या गोणीत काय आहे याचं विचारपुस केली असता त्यात व्हेल माशाची उलटीचा /वांतीचा एक मोठा तुकडा मिळुन आला असुन तो व्हेल माशाची उलटी / वांतीचा एक मोठया आकाराचा तुकडा असल्याची खात्री झाल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव दिनेश उमाजी भोनकर, वय – ४२ वर्षे, व्यवसाय – चालक, रा. सुरव तर्फे तळे, ता माणगांव, रायगड असे असल्याचे सांगितले. त्यास हे व्हेल माशाचे उलटीचा /वांतीचा तुकडा कशाकरीता आणल आहे याबाबत विचारणा केली असता त्याने तो विक्री करण्याकरीता आणल्याचे सांगीतले. त्याचे सोवर कोणकोण साथीदार आहेत याबाबत विचारणा केली असता त्याने माझेसोबत गाडीमध्ये १) वैभव बाबुराव कदम २) योगिता वैभव कदम, दोन्ही रा. ए १०४, गायत्री व्हिजन, नवीन पनवेल, ३) दत्तात्रेय मोहन शेटये, रा. दुसरं फणसवाडी, दादी शेट, अग्यारी लेन, चिराबाजार रोड, गिरगाव मुंबई नं. ०२, ४) सुरेश पंढरीनाथ नलगे, रा येहुरगांव, पाटोणा पाडा, पोखरण रोड नं. ०१, ठाणे पश्चिम आणि ५) सुर्यकांत वसंत पवार, रा. प्लॅट नं. १०९ मंगलमुर्ती अपार्टमेंट, नवघर आळी, सेक्टर १६ घणसोली, नवीमुंबई असे समोर असलेल्या हुंदाई कंपनीची ग्रॅड आय १० कार क. एमएच.०२ / सी.एच. ९७१७ या गाडीत बसलेले आहेत. गाडीत बसलेल्या इसमांकडे सद व्हेल माशाचे उलटी / वांती बाबत विचारणा केली असता त्यांनी आम्ही सदरची उलटी / वांती ही विक करण्याकरीता आणल्याचे पंचासमक्ष सांगीतले आहे. तसेच सदर व्हेल माशाची उलटी / वांती हीं कोणाकडुन आणली याबाबत विचारणा केली असता त्याने दिनेश शेडगे, रा. रायगड रोड महाड, ता. महाड, जि.रायगड असे असल्याचे सांगुन तो कोठे आहे याबाबत विचारणा करता तो पाठीमागुन येत आहे असे सांगितले. त्याचे ताव्यात मिळुन आलेल्या मालाची किंमत ५,८०,००,०००/- रू. दिनेश उमाजी भोनकर, व्यवसाय – चालक, रा. सुरव तर्फे तळे, ता. माणगांव, रायगड याचे ताब्यात मिळुन आलेल्या पांढ-या रंगाच्य वय – ४२ वर्षे प्लॅस्टीक गोणीमध्ये खोलुन पाहता त्यामध्ये प्लॅस्टीक पेपर व पेपराच्या कागदात गुंडाळलेली असुन त्यामध्ये व्हेल माशाची उलटी / वांती (Ambergris) चा एक मोठया आकाराचा तुकडा असा चॉकलेटी रंगाचा तुकडा असुन वजन काटयावर त्याचे वजन केले असता त्याचे वजन ०५ किलो ८०० ग्रॅम व एक हुंदाई कंपनीची ग्रँड आय १० कार क. एमएच.०२ / सी.एच.९७१७ असा एकुण ५,८२,००,०००/- मुद्देमाल मिळून आला असुन एक महिलेसह एकूण सहा आरोपीत यांना अटक करण्यात आलेली असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि श्री. लहांगे करीत आहेत.