“टायटन” पाणबुडीची दुर्घटना अत्यंत दु:खद…

रमेश कृष्णराव लांजेवार 

मो.नं.9921690779

भारतीय वेळेनुसार रविवारी 18 जूनला सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी टायटन पाणबुडीने अटलांटिक महासागरात पर्यटनासाठी सुरूवात केली.मात्र पर्यटकांचा काळ ओढवला आणि अचानक जगाला हादरा देणारी घटना 1 वाजून 45 मिनिटांनी घडली व “टायटन” पाणबुडी बेपत्ता झाल्याचे कळले.त्यानंतर तत्काळ शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली या मोहिमेत अमेरिकेचे तटरक्षक दल, कॅनडाचे संयुक्त बचाव केंद्र आणि फ्रान्सच्या बचाव पथकांनी सहभाग घेतला.परंतु टायटन पाणबुडीचे अवशेष सापल्यानंतर व पाचही अब्जाधीशांना मृत घोषित केल्यानंतर शोध मोहीम थांबविण्यात आली.म्हणजेच टायटन पाणबुडी कुठेतरी क्रॅश झाली असावी त्यामुळे ही दुर्घटना झाली असावी.

तब्बल 111 वर्षांपूर्वी अपघाताने अटलांटिक समुद्राच्या तळाशी 13 हजार फूट खोलावर विसावलेल्या “टायटॅनिक”या जहाजाचे अवशेष पहाण्यासाठी गेलेल्या पाच अब्जाधीशांना अत्यंत महागात पडले व आपला जीव काही क्षणातच गमवावा लागला ही अत्यंत भयावह व अंगावर शहारे येणारी दुर्घटना घडली.टायटॅनिक जहाजाजवळुन “टायटन” पाणबुडीचे शेवटचे लोकेशन रेकॉर्ड करण्यात आले होते.बेपत्ता झाल्यानंतर काही वेळातच स्फोटाशी संबंधित काही सिग्नलही रडारवर आढळले तेव्हाच चिंता गडद झाली व शेवटी त्यांचा मृत्यू झाल्याची शंका वाढली.यामुळे संपूर्ण जगात शोककळा पसरल्याचे दिसून आले.

टायटन पाणबुडीमध्ये पाकिस्तानचे अब्जाधीश शहजादा दाऊद व त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डींग, पाणबुडी बनविणाऱ्या ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉकटन रश व माजी फ्रेंच नौदल अधिकारी पॉल हेन्री अशाप्रकारे जगाचा कारोबार चालविणारे व दिशा निर्देश ठरविणारे महान पाच अब्जाधीश विभूती हे जगाला सोडून गेले हीबाब कोणीही विसरणार नाही.या पाचही अब्जाधीशांचा मृत्यू टायटनच्या आढळलेल्या अवशेषांवरून सिध्द झालेला आहे.टायटनचे अवशेष टायटॅनिकच्या अवशेषांपासुन काही अंतरावर आढळले.

“ओशीनगेट एक्पेडिशन्स”ही कंपनी सन 2021 पासून वार्षिक समुद्री पर्यटनाव्दारे समुद्राच्या आत टायटॅनिकच्या आजुबाजुच्या वातावरणाचा अभ्यास करत होती.परंतु 18 जूनला 2023 ला घात झाला आणि टायटन दुर्घटना ग्रस्त झाली व पाचही अब्जाधीशांचा मृत्यू झाला.यामुळे ओशीनगेट एक्पेडिशन्स कंपनीच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here