माणगांव तालुक्यात अखेर पावसाच्या सरी बरसल्या, शेतकऱ्यांसह नागरिक वर्गात आनंदाचे वातावरण….

✍️सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-माणगांव तालुक्यात अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा मोठया संकटात सापडलेल्या परिस्थितीत पाहायला मिळाला होता तर दुसरीकडे तीव्र उष्णतेमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. परंतु आज पहिल्याच पावसामुळे हवेत गारवा आला असून गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 ७ जून रोजी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता त्याप्रमाणे अधून मधून हलक्या पावसाचे आगमन झाले होते या अंदाजाने शेतकऱ्याने शेतीच्या कामाला सुरुवात केली परंतु बऱ्याच दिवसापासून पावसानी दंडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती परंतु आज पहाटे पासून पावसानी चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा व उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांमध्ये आनंदाचा वातावरण पाहायला मिळत आहे.

त्याच प्रमाणे माणगांव तालुक्यातील काही गावांना पाणी टचाईमुळे मोठी कसरत करावी लागत होती मात्र आज सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाई गावांना थोडा फार दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here