विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा भाजपात प्रवेश

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा भाजपात प्रवेश

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा भाजपात प्रवेश

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

विदर्भाचा विकास व ओबीसी बांधवांच्या हिताचे निर्णय घेण्यात भाजपा समर्थ – डॉ. अशोक जिवतोडे

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर ब्युरो चीफ
📱8830857351

चंद्रपूर : 25 जून : -राष्ट्रवादी पक्षात असताना ओबीसींना न्याय देता येत नव्हता. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ओबीसींच्या बाबतीत जे 22 निर्णय झाले. त्यातील तब्बल 16 निर्णय हे राज्यात देवेंद्र फडणवीस आणि देशात नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात झाले. ओबीसींना न्याय देण्याचे काम केवळ भाजपच करू शकते. याची पूर्ण खात्री असल्यानेच आपण भाजपात प्रवेश केला.
असे प्रतिपादन विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करताना केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी रविवार, 25 जून रोजी जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भव्य सोहळ्यात भाजपात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
डॉ. जीवतोडे म्हणाले, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांनी पूर्व विदर्भात शिक्षणाची क्रांती घडवून आणली. सोबतच बहुजनांसाठी लढा उभा केला. हाच धागा पकडून विदर्भ, ओबीसी आणि बहुजनांचा विकास व्हावा हेच आपले अंतिम ध्येय आहे.
कार्यक्रमात अशोक जीवतोडे यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकत पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी नुकताच फ्लोरेन्स नाईटिंगल पुरस्कार प्राप्त पुष्पा पोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकार, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
उप मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. अशोक जीवतोडे यांचा आज भाजपाध्ये प्रवेश होत आहे. ही आपल्या सगळ्यांकरिता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ‘हजुर आपने आते, आते बहोत देर कर दी’ असे म्हणत तुमच्याकरिता तुमच्या विचाराकरिता, तुमच्या कार्याकरिता सर्वोत्तम पक्ष जर कुठला असेल तर तो भाजपा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक चहा विकणारा सामान्य ओबीसी घरचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान बनला ही देशासाठी गौरवाची बाब असून, या पेक्षा ओबीसीचा मोठा सन्मान असू शकत नाही. भाजपामध्ये ओबीसीकरिता अनेक निर्णय घेण्यात आले आहे. ओबीसी मंत्रालय काढले, महाज्योती सारखी संस्था काढून ओबीसी मुलांसाठी पीएचडी, आयएसएस, आयपीएस, एमपीएससी होण्याकरिता दारे खुली करून दिली. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती दिली. फ्री शिप चालू केली. ओबीसी समाजाला मुख्यधारेमध्ये आणण्याचे काम भाजपा करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षाला ओबीसी फक्त चहरे दाखविण्यासाठी हवे आहे. पद देण्याकरिता नको आहे, असे सांगतत डॉ. जीवतोडे यांच्या येण्यामुळे ओबीसी चळवळील बळ मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाची सर्व ताकद ही ओबीसी चळवळीच्या पाठीमागे उभी करण्याचे कार्य आम्ही करू, असेही ते म्हणाले. तसेच समृध्दी महामार्गासाठी चंद्रपूरचा विचार आपण निश्चित करू, असेही आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.


देशाच्या मंत्रीमंडळामध्ये आज सर्वाधीक ओबीसी मंत्री आहे. या पूर्वीच्या कुठल्याही मंत्रीमंडळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळाल नव्हते. हा ओबीसी मंत्र्यांचा रेकॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाने पूर्ण केला आहे. कारण भारतीय जनता पक्षाचा डीएनएच ओबीसी आहे, असे प्रतिपादन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
यावेळी वने, सांस्कृतिक व मत्सव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, आ. बंटी भांगडीया, आ. परिणय फुके, आ. संजीव बोदकुलवार, आ. संदीप धुर्वे, माजी आमदार अतुल देशकर, सुदर्शन निमकर, संजय धोटे, डॉ. आशिष देशमुख, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष प्रतिभा जीवतोडे, उपाध्यक्ष अंबर जीवतोडे, रोहिणी जीवतोडे आदी मान्यवरांची उपस्थित होते.
===============================

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here