गोल पूल पुन्हा जड वाहनांसाठी बंद
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
बल्लारपूर : 25.जून
येथील वस्ती विभागाला जोडणारा गोल पूल परत एकदा रस्त्याच्या डागडुजीकरिता 22 जून ते 27 जून मध्यरात्रीपर्यंत बंद करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषदतर्फे देण्यात आली आहे. यावेळी मात्र हा मार्ग फक्त जड वाहतुकीकरिताच बंद करण्यात येणार आहे. मागच्याच आठवड्यात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा मार्ग तिसर्यांदा बंद करण्यात आला होता. मात्र जड वाहतूक सुरू होताच रस्त्याची वाताहत होऊन काही दिवसातच गिट्टी बाहेर निघू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या गुणवत्तेवर शंका येणे साहजिक आहे. यंदा तरी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.