वरोडा कृषी उत्पन्न बाजार समिती आता पेट्रोल पंप व्यवसायात • आर्थिक उन्नतीसाठी सुरू करणार पेट्रोल पंप • भारत पेट्रोलियम कंपनीकडून मंजुरी प्रदान

वरोडा कृषी उत्पन्न बाजार समिती आता पेट्रोल पंप व्यवसायात

• आर्थिक उन्नतीसाठी सुरू करणार पेट्रोल पंप
• भारत पेट्रोलियम कंपनीकडून मंजुरी प्रदान

वरोडा कृषी उत्पन्न बाजार समिती आता पेट्रोल पंप व्यवसायात • आर्थिक उन्नतीसाठी सुरू करणार पेट्रोल पंप • भारत पेट्रोलियम कंपनीकडून मंजुरी प्रदान

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

वरोडा : 25 जून
केंद्र शासनाच्या सहकार धोरणानुसार शासनाने काही बाजार समितीला उत्पादनाचे साधन कायमस्वरूपी उपलब्ध व्हावे यासाठी वरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भारत पेट्रोलियम कंपनीने पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी व चार्जिंग सेंटर मंजूर केले. त्याबाबतचे मंजुरी पत्र प्रादेशिक प्रबंधक एम. शिवप्रसाद रेड्डी यांनी बाजार समितीला मंजूरीपत्र प्रदान केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीला भविष्यात कायमस्वरूपी उत्पादनाचे साधन उपलब्ध व्हावे व त्या उत्पन्नातून शेतकर्‍यांना अधिकच्या सोयी सवलती तसेच सुविधा निर्माण करून देण्यासाठी बाजार समिती वरोडा यांनी भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड यांच्याकडे पेट्रोल पंप मिळण्याकरता अर्ज केला होता, अवघ्या दोन महिन्यात कंपनीने बाजार समितीला पेट्रोल पंप मंजुरी प्रदान केली. हा पेट्रोल पंप हा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयालगत असलेल्या खाली जागेत सुरू होणार असून, शहरातील हे दुसरे पेट्रोल पंप ठरणार आहे. सध्या स्थितीत शहरातील पेट्रोल डिझेल ग्राहकांची गरज लक्षात घेता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी दुसर्‍या पेट्रोल पंपाची आवश्यकता होती, ती गरज मात्र काही महिन्यात पूर्ण होणार आहे.
पेट्रोल पंप निर्माण व्हावे व बाजार समितीचे विविध प्रकल्प सुरू करण्यात यावे, याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन तो ठराव शासनाला पाठविला होता. त्यानुसार शासनाने पेट्रोल पंप मंजुर केले असून, त्याच बरोबर पणन मंडळाने शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी मंजूरी प्राप्त झाली आहे.
यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय देवतळे, उपसभापती जयंत टेंमुर्डे, संचालक प्रवीण मालू यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here