वसतिगृह त्वरित सुरू करा, अन्यथा मुक्काम आंदोलन • ओबीसी विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रतिक्षेत

वसतिगृह त्वरित सुरू करा, अन्यथा मुक्काम आंदोलन

• ओबीसी विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रतिक्षेत

वसतिगृह त्वरित सुरू करा, अन्यथा मुक्काम आंदोलन • ओबीसी विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रतिक्षेत

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 25 जून
राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यामध्ये 72 वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला. 2023- 2024 मध्ये वसतिगृह प्रवेशाचे विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले. पण, वसतिगृहात प्रवेश दिला नाही. अजूनही विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत आहे. 1 जुलै पासून महाविद्यालय सुरु होत आहे. पण, अद्याप वसतिगृहात सुरू करण्यात आले नाही. वसतिगृह त्वरित सुरू करण्यात यावे, अन्यथा इतर मागास बहुजन कार्यालयात मुक्काम आंदोलन करू, असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांनी दिला आहे.
2024-2025 शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ओबीसी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करावी, कनिष्ठ महाविद्यालयीन (वर्ग 11 वी, 12वी )ओबीसी,एन.टी.,एस.बी.सी., विद्यार्थ्यांना ओबीसी वसतिगृहात प्रवेश देण्यात यावे, कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी, एन.टी, एस.बी.सी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करावी, वसतिगृह प्रवेशासाठी व आधार योजनेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राचे बंधन वगळण्यात यावे, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ओबीसी विद्यार्थ्यांचा कोटा पुर्ववत 20 टक्के करावा, ओबीसी विद्यार्थ्यांनाही 100 टक्के शुल्क सवलत लागू करावी, उत्पन्न मर्यादा रद्द करण्यात यावे, मुलींच्या मोफत शिक्षणाचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा, गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती देण्यात यावी आदी मागण्या ओबीसी सेवा संघाने केल्या आहेत. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व सहाय्यक आयुक्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग, यांना दिले आहे.
मागण्यांची पूर्तता न झाल्यास इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात मुक्काम आंदोलन व सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा डहाके यांनी दिला. यावेळी जिल्हा महासचिव अ‍ॅड्. विलास माथनकर, अ‍ॅड्. पुरुषोत्तम सातपुते, भाविक येरगुडे, अजय मोहुर्ले, पायल बोरकर, सपना मोहुर्ले, वाल्मीक गुरूनुले, अमर कावळे आदींसह अन्य ओबीसी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here