सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचे अमरावती मध्ये आगमन

सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचे अमरावती मध्ये आगमन

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सहसंपादक✍🏻
मो 9860020016

अमरावती :- सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई यांचे आज अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले.
सरन्यायाधीश न्या. श्री. गवई यांच्या स्वागतासाठी खासदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र उपस्थित होते. त्यांनी विमानतळावर सरन्यायाधीश न्या. श्री. गवई यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी लाकडावर कोरीवकाम केलेली भारताचे संविधान उद्देशिका भेट दिली.