भिवंडीत दरड कोसळल्याने झोपड्यांचे नुकसान
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी : भिवंडीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे महापालिका कार्यक्षेत्रात प्रभाग समिती क्रमांक ०२ व वॉर्ड क्रमांक १२ येथील गायत्री नगरमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली, ज्यामध्ये पाच नुकसानग्रस्त घरे झाली आहेत दिलासादायक बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेचे प्रभाग ०१ व ०२ चे प्रभाग अधिकारी मकसूम शेख आणि माणिक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भागातील रहिवाशांना मे महिन्यातच घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. परंतु सूचना मिळाल्यानंतरही गायत्री नगर येथील तीन कुटुंबांनी वेळेवर घरे रिकामी केली होती, मात्र दोन कुटुंबे अजूनही तिथेच कहर करून राहत होती. पावसामुळे सोमवारी रात्री एका मोठ्या झाडाची फांदी त्याच्या घरांवर येऊन कोसळली, ज्यामुळे डोंगराचा असलेल्या मलबा आणि मोठमोठे दगड खचल्याणे थेट घरांवर येऊन आदळले. या दुर्घटनेत घरे पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहेत. तसेच यात कोणालाही जीवितहानी व इजा झालेली नाही.या दुर्घटनेत आपत्कालीन विभाग व महापालिका प्रभाग समिती क्र. ०१ व ०२ तात्काळ कारवाई करत असून आज सकाळपासून परिसरातील उर्वरित घरे रिकामी करण्याचे काम सुरू केले आहे, जेणेकरून भविष्यातील संभाव्य धोका टाळता येईल. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून, दोन्ही कुटुंबांना महापालिका शाळेत तात्पुरती निवासाची सोय करून देण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका आपत्कालीन प्रमुख शाकीब खर्बे यांनी दिली आहे,