शशांक नामेवार यांना “बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर” अवॉर्ड जाहीर

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
गडचादुर ,नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड आणि चिंतामणी ग्रुप ऑफ इन्टिट्युशन संचालित चिंतामणी महाविद्यालय घुग्गूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत गडचांदूर येथील शरदराव पवार महाविद्यालयाचे मुख्य लिपिक “शशांक नामेवार” यांना “आंतरराष्ट्रीय बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर” पुरस्कार जाहिर झाला आहे.प्रमाणपत्र,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून इंग्लंड व भारतातील सदस्य असलेल्या गठित समितीद्वारे नामेवार यांची निवड करण्यात आली आहे.आंतरराराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजकांकडून विविध आतंरराष्ट्रीय पुरस्कारासाठी आवेदनपत्र मागविण्यात आले होते.यामध्ये देशभरातून १०९ प्रस्ताव आले. त्यापैकी २८ पात्र प्रस्ताव निवडण्यात आले.सदर परिषदेत पात्र प्रस्तावांना विविध गटात पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे.
शशांक नामेवार हे महाविद्यालयात मुख्य लिपिक पदावर कार्यरत असून त्यांचे महाविद्यालयातील प्रशासकीय कार्यात व विविध उपक्रमात तसेच राष्ट्रीय सेवा योजना,प्रौढ शिक्षण,गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) तथा माजी विद्यार्थी,पालक समिती अशा सर्व समित्यांचे ते सदस्य असून यांनी शंभराच्या वर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदविला तसेच प्रशासकीय गुणवत्ता सुधार अंतर्गत यांनी अनेक उद्बोधन व उजळणी वर्ग पूर्ण केले.नुकतेच यांना गोंडवाना विद्यापीठाच्या उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यासर्व कार्याची दखल घेऊन यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयरचा पुरस्कार जाहिर झालेला आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.