महाराष्ट्र राज्यात माघील 24 तासात 5 हजार 212 कोरोनाबाधितांची रुग्णांची नोंद, 123 रुग्णांचा मृत्यू.

✒नीलम खरात✒

मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि25 जुलै:- महाराष्ट्र राज्यात माघील 24 तासात कोरोना वायरस बाधित रुग्णांच्या संख्येतमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळते आहे. माघील 24 तासात महाराष्ट्र राज्यात एकूण 5 हजार 212 कोरोना वायरस बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये शनिवारच्या तुलनेत घट झालेली बघायला मिळत आहे. शनिवारी राज्यात 6 हजार 753 कोरोना वायरस बाधितांची नोंद झाली होती. तर रविवारी माघील 24 तासात 123 कोरोना बाधितांची मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असली तरी सध्या 95 हजार 985 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसतं आहे.

महाराष्ट्रात 5 लाख लोक क्वारंटाईन.

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण 5 लाख 17 हजार 362 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3 हजार 506 व्यक्ती हे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 123 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09% एवढा आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5 हजार 212 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 60 लाख 35 हजार 029 नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.33 टक्क्यांवर गेलं आहे. परंतू सध्या कोरोनावर उपचार घेण्याची संख्या लाखांच्या जवळपास असल्यान राज्याची चिंता मिटली नाही.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 68 लाख 43 हजार 984 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 64 हजार 922 (13.37 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या कोल्हापूर, ठाणे, सांगली आणि मुंबई जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 62,64,922 झाली आहे.

राज्यात अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव तीव्र असताा ऑगस्टच्या अखेरपासून महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा चा इशारा दिला आहे. तज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेमध्ये राज्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे राज्य सरकारनं तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या उपाययोजना करुन ठेवल्या आहेत. तसेच काही ठिकाणी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here