मोठ्या भावानेच केली लहान भावाची गळा दाबून हत्या
घरगुती कारणातून हत्या केल्याचा संशय

घरगुती कारणातून हत्या केल्याचा संशय
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा येथिल सोमनाथपूर वॉर्ड परिसरात घरगुती वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबुन हत्या केल्याची घटना आज दिनांक 25 जुलै 2021 रोजी उघडकीस आली असुन हत्येची माहिती मिळताच परिसरात खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी 12:30 ते 1:00 च्या दरम्यान काहीतरी कारणाने सुरज व धीरज देवगडे ह्या भावात वाद सुरु झाला आणि वादाचे स्वरूप हाणामारीत झाले व त्यातच मोठा भाऊ सुरज देवगडे ह्याने रागाच्या भरात धीरज देवगडे ह्याचा गळा दाबुन त्याला ठार केले.
धीरज हालचाल करत नसल्याचे पाहुन त्याला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून धीरज ह्याचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिस घटनास्थळी पोहोचले असुन पुढील कारवाई सुरू आहे.