*पुराच्या पाण्यातून बैलगाडी आणत असतानाच बैलाचा पाय घसरला अन्…;*

चिमूर ( समुद्रपूर ) : – सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की ,सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुराच्या प्रवाहात मालक आणि बैलांसह बैलगाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनाला चटका लावणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तालुका प्रशासनाकडून शोध मोहीम सुरु असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.असे आमच्या प्रतिनिधी ला सांगण्यात आले आहे.