जिल्हा गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील, सुराय्यापल्ली आणि सिरोंचा स्थानिक युवा वर्गानी शिव संपर्क अभियान मोहीम कार्यक्रम

जिल्हा गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील, सुराय्यापल्ली आणि सिरोंचा स्थानिक युवा वर्गानी शिव संपर्क
अभियान मोहीम कार्यक्रम

जिल्हा गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील, सुराय्यापल्ली आणि सिरोंचा स्थानिक युवा वर्गानी शिव संपर्क अभियान मोहीम कार्यक्रम
जिल्हा गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील, सुराय्यापल्ली आणि सिरोंचा स्थानिक युवा वर्गानी शिव संपर्क
अभियान मोहीम कार्यक्रम

मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी मीडिया वार्ता न्युज
(ग्रामीण)मो.नं ९४०५७२०५९३

सीरोचा अहेरी जिल्हा प्रमुख रियाज भाऊ शेख यांचे शुभ हस्त्ये शिव बंधन बांधून जाहीर शिवसेनेत प्रवेश केले. यावेळी तालुका प्रमुख अमित भाऊ तीपत्तिवार यांनी प्रास्ताविक मार्गदर्शनात संघटन मजबूत करण्यासाठी युवा समोर यावे, करुणा ताई जोशी यांनी प्रवेश केलेल्या युवांना गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक कार्यक्रम राबवून लोकांचे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. अध्यक्षीय भाषणात जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी युवा सेना तालुक्यात स्थापना करून शिवसेना विचारधारा घरा घरात पोहचवू युवा देशाचे भविष्य असून आपण समोर येऊन लोक हिताचे कार्य करू असे आव्हान जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच मा. किशोर पोतदार साहेब गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या आदेशाने शिव संपर्क अभियान मोहीम समोर ०१/०८/२०२१ पर्यंत वाढवून कार्यक्रम राबवावी कारण अहेरी विधानसभा क्षेत्र हा फार मोठा अंतराने पसरलेला असल्याने गावागावात पोहचणे शक्य नाही म्हणून सदर शिव संपर्क अभियान मोहीम सुरू ठेऊन विभाग निहाय बैठक घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्य करावे आणि जन सामान्य लोकांचे प्रश्न सोडवावे शासना पर्यंत पाठपुरावा करून मार्गी लावावे. असेही गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख, मा. पोतदार साहेब यांनी सांगितले.