जळगाव राजमालती नगर येथील एकाला विनाकारण मारहाण.

46

जळगाव राजमालती नगर येथील एकाला विनाकारण मारहाण.

 

जळगाव राजमालती नगर येथील एकाला विनाकारण मारहाण.
जळगाव राजमालती नगर येथील एकाला विनाकारण मारहाण.

मिडीया वार्ता न्यूज नेटवर्क

जळगाव,दि.25 जुलै- जळगाव येथील राजमालती नगर मधुन एक बातमी समोर आली आहे. काही गुन्हेगार प्रवुर्तीच्या लोकांनी मिळुन एका व्यक्तीला कारण नसताना मोठ्या प्रमाणात मारहाण केली आणि त्यांच्या खिसात असलेले पैसे लूटण्यात आले आहे.

आज जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात क्राईम वाढत आहे. काही गुन्हेगार प्रवुर्तिचे लोक पोलिसाला जुमानत नाही असे दिसत आहे. आज पोलीस विभाग कुंभकर्णाच्या भुमीकेत असल्यामुळे असे गुन्हेगार खुल्ले आम पोलिसांच्या नाकावर टीचुन गुन्हे करत आहे.

मंगेश सुभाष काजवे वय 24 वर्ष राहणार दूध फेडरेशन जवळ राजमती नगर जळगाव 24 जुलै रात्री 8 वाजेच्या सुमारास याला काही गुंडानी मिळुन मोठ्या प्रमाणात मारहान केल्याची माहिती समोर आली आहे.

मंगेश काजवे यांच्याकडून प्राप्त झालेली माहितीनुसार, मंगेश हा गणेश कॉलनी येथे गेला असता तो आपल्या घरी येत असताना सुरत रेल्वे गेट जवळ आधीपासूनच तिथे महमूद पटेल, संजू पटेल, जास्मीन पटेल, जानू पटेल, शोयब पटेल, आवेश पटेल, जुबेर, जुनेद पटेल आणि त्याचा भाऊ हे सर्व जण तिथे उभे होते.आणि काही कारण नसताना विनाकारण मारहाण केली. तसेच त्यांच्या कडे लोखंडी हत्यारे होती. तसेच जुनेद पटेल याने त्याच्या शर्टच्या खिशातून सातशे तीस रुपये काढले असेही त्याने सांगितले.