नागभिड तालुकातील कोरंबी येथे ग्रामीण सत्र शिबिर

नागभिड तालुकातील कोरंबी येथे ग्रामीण सत्र शिबिर

नागभिड तालुकातील कोरंबी येथे ग्रामीण सत्र शिबिर

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड– नागभीड तालुक्यातील शेवटच्या टोकावर समजल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण डोंगराळ आणि जंगल व्याप्त गावात दिनांक २३ जुलैला कोरंबी येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर या महाविद्यालयाने एक दिवशीय ग्रामीण सत्र आयोजित केला होता.
कोरंबी गावातील लोकांनी या गावाला कशाप्रकारे स्वच्छता आणि मेरा गाव मेरा राज या उद्देशाने एक परिपक्व गाव बनवले यांचा अभ्यास करण्यासाठी आणि गावातील लोकांसोबत चर्चा करण्यासाठी एक दिवशी शिबिर कोरंबी या गावात आयोजित केला होता. त्यावेळेस प्राध्यापक बन्सोड यांनी जंगलातील रानभाजी आणि फळांचे महत्त्व पटवून देऊन गावकऱ्यांना मोहफुल आणि जांभूळ वेचताना त्रास होऊ नये यासाठी एक ताडपत्री भेट दिली. तसेच अवार्डचे संस्थापक अध्यक्ष गुणवंतजी वैद्य यांनी कोरंबी गावातील लोकांनी एकत्र येऊन गाव विकशित कसा केला आणि सामूहिक वन हक्क समितीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी सामूहिक वन समितीच्या सर्व सदस्यांनी तसेच गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here