दुःखाचे मूळ तृष्णा खास वर्षावासा निमित्त
✍विजेंद्र मेश्राम✍
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
89750 19967
गोंदिया :- आज आपण बघतोय की प्रत्येक माणूस धावतोय कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नाही ,बोलायला वेळ नाही, आणि ऐकायला वेळ नाही ,पण ह्या जीवन प्रवासात माणूस काहीतरी गमावत चाललाय असं वाटत नाही का? हे कुणाचे लक्षात कसे येत नाही? जेव्हा यायला लागते तेव्हा वेळ निघून गेलेली असते .पोटापुरते तर मिळाले पण अजूनही काहीतरी मिळेल का ह्या आशेने माणूस सारखा मृगजळा मागे धावताना दिसतो मृगजळ म्हणजे काय ? एखादी गोष्ट कायम आहे असा भ्रम व्हायला लागणे, वास्तवात नसणाऱ्या गोष्टीच्या मागे धावायला लागणे , माहीत नसलेल्या गोष्टींच्या मागे पडणे म्हणजे मृगजळ, अशा आभासामुळे माणसाच्या वाट्याला काय येणार दुःख ,नैराश्य ,अपयश ,पश्याताप, हतबलता आणि काय ? खरंतर मृगजळ हा एक आभास आहे एक असत्य आहे. अशी सक्तीची भावना आहे जे दिसते ते क्षणाक्षणाला बदलताना दिसते. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाताना दिसते तीच ती स्थिती कधी कायम राहत नाही अशा बदलणाऱ्या वस्तूच्या मागे लागून काय उपयोग मग सुखकारक काय आहे काहीच नाही ना? तरीपण हे माझे ,ते माझे, आणि दुसऱ्याचेही माझे, हा हावरापणा कशासाठी? मग त्यात टिकाऊ असे काय आहे सर्व मागेच ठेवून द्यायचे आहे आपण हक्क सांगून काय उपयोग त्याबद्दलची आवश्यकता कशासाठी त्याच्या धावा करून काय उपयोग ,माणसे समजून का घेत नाही म्हणतात ना दिसते तसे नसते म्हणून जग फसते माणूस फक्त सुगंधाच्या मागे सैरावैरा पडताना दिसतो भरपूर काही मिळवण्यासाठी हावऱ्यासारखा धडपडताना दिसतो .जी अनित्य आहे परिवर्तनशील आहे जे सोडून जाणारे आहे त्याला कवटाळताना दिसतो. त्यामुळे स्वतःचे दुःख स्वतःच वाढवताना दिसतो. आजकाल सर्वांचे असेच झाल्याचे दिसून येते पण तो सुगंध कायम टिकणार आहे का? नाही ना? नेमके कुठल्या वर्णावर थांबायचे कुठे उतरायचे आणि काय करायचे याचा जर विचार होत नसेल तर मग दुःख माणसाच्या पाठलाग करणार नाही का? मनाला जर काबू ठेवले तर हा जीवन प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होईल यात शंकाच नाही त्यासाठीच धम्माचे प्रयोजन आहे. तृष्णा त्याग करणे म्हणजेच धम्म होय, धम्म हा आदर्श जीवन मार्ग आहे जो तृष्णेच्या आहारी गेला तो चक्रव्यूहात अडकला म्हणून समजा. त्याच्या विकास खुंटला म्हणून समजा . म्हणून बुद्ध म्हणतात ज्याला निरव शांतता पाहिजे व मानसिक समाधान पाहिजे. त्यासाठी त्यांनी तृष्णेच्या त्याग केला पाहिजे तृष्णा या तीन प्रकारचे आहेत काम तृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा, इंद्रियावर ताबा नसलेला माणूस सारखा त्यात बुडला जातो रोगाची शिकार होतो व समाजातील प्रश्नही घालवून बसतो प्रतिष्ठा घालवून बसतो ह्या तृष्णेला काम तृष्णा म्हणतात. नेहमी जिवंत राहावे असे वाटते, परत परत जन्म घ्यावासा वाटतो, खाओ पियो और बहुत मजा करो असे सारखे मनाला वाटायला लागल्यामुळे माणूस परत दुःखात ओढला जातो. अशा तृष्णेला भव तृष्णा म्हणतात. ह्या जन्मत सारे दुःख भोगल्यामुळे धरतीवर परत जन्मच घ्यायला नको परत त्या फेऱ्यात अटकायलाच नको अशा मनाच्या धारणेला विभव तृष्णा म्हणतात .म्हणून साऱ्या दुःखाचे मुळ तृष्णाच आहे. भूक, तहान , हाव ,अभिलाषा ही तृष्णाची रूप आहेत. जी कधीही मिटत नाहीत. उलट लोभ, द्वेष, मत्सर, खून ,वैर,व हिंसेला जन्माला घालत असतात .एक तृष्णा संपली की दुसरी उत्पन्न होत असते.असे म्हणतात की गवत खाणारे प्राणी नेहमी ताज्या कुराणाच्या शोधात भटकत असतात. माणसाचे ही अगदी तसेच आहे. ते नेहमी आनंद देणाऱ्या नवीन नवीन वस्तूचा, साधनांचा शोध घेताना दिसतात. तो आनंदही क्षणिकच असतो. हेच नेमके ते विसरताना दिसतात आणि दुःखाच्या जाळ्यात अलगद अडकताना दिसतात. म्हणून ह्या जाळीलाच कायमचे नष्ट करा म्हणजे झाले. केंद्रीय शिक्षक एन एल मेश्राम भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष गोंदिया.