जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जवळील आकर्षण असलेला सप्तकुंड ४ वर्षा पासून बंद अजिंठा वनविभागाच्या सतत गैरहजर राहणा-या कर्मचाऱ्याच्या गलथान कारभारामुळे लेणीत येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड फर्दापुर यांच्या कडून ग्राऊंड रिपोर्ट

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जवळील आकर्षण असलेला सप्तकुंड ४ वर्षा पासून बंद

अजिंठा वनविभागाच्या सतत गैरहजर राहणा-या कर्मचाऱ्याच्या गलथान कारभारामुळे लेणीत येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड

फर्दापुर यांच्या कडून ग्राऊंड रिपोर्ट

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जवळील आकर्षण असलेला सप्तकुंड ४ वर्षा पासून बंद अजिंठा वनविभागाच्या सतत गैरहजर राहणा-या कर्मचाऱ्याच्या गलथान कारभारामुळे लेणीत येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड फर्दापुर यांच्या कडून ग्राऊंड रिपोर्ट

✍मनोज एल.खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर- 9860020016

फर्दापुर : – जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी देश, विदेशातील पर्यटक भारतात येतात. पावसाळ्यामधील निसर्गरम्य वातावरण व हिरवाईने नटलेली जगप्रसिद्ध लेणी व त्यावर निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू,त्यातच नयनरम्य छोटे-मोठे धबधबे हे बघण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक हे लेणी बघण्यासाठी पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्या परिवारासह आनंद घेण्यासाठी येतात.या पर्यटकांना आकर्षण असलेला लेणीजवळील वनविभागाअंतर्गत सप्तकुंड धबधबा हा पाहता येत नाही याचे कारण असे की, वनविभागाच्या बेजबाबदार कर्मचाऱ्याच्या सतत गैरहजेरीमुळे गेल्या चार वर्षापासून तो बंद आहे.

सप्तकुंड मधून तापी खो-याला मिळणा-या वाघुर नदीचा उगम होतो अशा ह्या उगमस्थान असणा-या या वाघुर नदीच्या उगम सप्तकुंड बघण्यासाठी पर्यटकांचा गेल्या चार वर्षापासून हिरमोड होताना दिसत आहे.
हा सप्तकुंड का बंद ठेवला तर याचे कारण असे की, चार पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी एक छोटी दरड कोसळली होती. त्यावेळेस सप्त कुंडाकडे जाणारा मुख्यरस्ता,गार्डन कडील रस्ता हा बंद करण्यात आला होता. त्या ठिकाणी काटे,कुंपण लावून येणाऱ्या पर्यटकांना सप्तकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यापासूनच माघारी फिरावे लागत होते जी दरड कोसळली होती ती आजपर्यंत त्याच अवस्थेमध्ये आहे ते फक्त आणि फक्त अजिंठा वन विभागातील अधिकारी, व कर्मचारी यांच्या ढिसाळ कारभारामुळेच तशीच पडून आहे.

या बाबत अजिंठा वनविभागाने शासनाकडे आजपर्यंत कोणताही पाठपुरावा केलेला नाही. ही दरड काढण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करावा लागेल, पाठपुरावा करावा लागेल.असे प्रश्न व उत्तरे दरवर्षी आम्हा पत्रकारांना देतात. मात्र यांनी कुठल्याही प्रकारचा पाठवपुरावा हा चार वर्षात केलेला दिसून येत नाही.
अजिंठा वनविभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी याकडे साधे फिरकून सुद्धा बघत नाही कारण अजिंठा लेणीचा जो परिसर आहेत त्या परिसरातून नदी जवळील मुख्य सप्तकुंडाकडे जाणारा रस्ता असून व वनविभागाची जी छत्री आहे ज्या ठिकाणी पर्यटक बसतात व निसर्गरम्य वातावरणा मध्ये लेणीचा संपूर्ण परिसर त्या ठिकाणाहुन फोटोशुट करतात. त्या छत्रीची जी हद्द आहे ती अजिंठा वनविभागामध्ये येते.सन २०२१ या साली वन वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच मुंबई येथील एक तरुण मुलगा जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना आपल्या मित्रासोबत अजिंठा लेणीची सैर करण्यासाठी आला होता.त्यावेळेस छत्रीपासूनच काही अंतरावर कठडे तुटलेले आहेत ते ओलांडून त्या ठिकाणी सप्तकुंड धबधबाचे फोटो काढत असताना त्याचा तोल गेला होता आणि तो कुंडामध्ये पडला होता सुदैवाने तो वाचला मात्र आज रोजी त्या ठिकाणी तुटलेले लोखंडी पाईप, संरक्षण कठडे हे तुटलेल्या अवस्थेत आज रोजी जैसे थे वैसे तसेच पडून आहेत. कोणत्याही प्रकारची सुधारणा आज पर्यंत अजिंठा वनविभागाच्या बेजबाबदार अधिकारी व काम चुकार कर्मचा-याकडून झालेली नाही.तसेच त्या ठिकाणी वनविभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी सहा सहा महिने फिरकून सुद्धा बघत नाही किंवा एक ही कर्मचारी त्या हद्दीत तैनात सुद्धा दिसत नाही. आज रोजी पर्यटकांना त्या ठिकाणी बसण्यासाठी साधी व्यवस्था सुद्धा नाही. छत्रीची अशी अवस्था झालेली आहे की,त्या छत्री वरील संपूर्ण पत्रे उडालेले आहे. छत्री पासून काही अंतरावर खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही प्रकारची संरक्षण भिंत,लोखंडी पाईप कठडे म्हणून बांधलेले नाही. पर्यटकांना जीव मुठीत घेऊन तिथून उतरावे लागते दरवर्षी वनविभागाला लाखो रुपयाचा निधी मिळतो मात्र तो निधी अजिंठा वनविभागाने अजिंठा लेणी वनपरिसरात आज रोजी कुठेही खर्च केलेला दिसून येत नाही.येणाऱ्या पर्यटकांना साधी बसण्यासाठी व्यवस्था नाही.अधिकारी व कर्मचारी मात्र घरी बसूनच राज्य शासनाचा फुकटचा पगार घेत आहे.सप्तकुंड कडे जाणारा मुख्य रस्त्यावर पडलेली दरड हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा.वरील छत्री जवळील तुटलेले संरक्षण कठडे बांधण्यात यावे. याकडे वनविभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन येणाऱ्या पर्यटकांना सप्तकुंड धबधबा बघता येईल अशा मागण्या पर्यटक करत आहे.
तसेच या वनविभागाच्या समस्याच्या बाबतीत तक्रारी आलेल्या हजारो पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here