गॅस सिलेंडरवरील सबसिडी रद्द होण्याची शक्यता
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
नवी दिल्ली, : – 24 जुलैकेंद्र सरकार एलपीजी गॅस सिलेंडरवरील अनुदान रद्द करण्याच्या विचारात आहे. एलपीजी गॅसवरील अनुदानामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होतो, पण सरकारने गॅसवरील सबसिडी रद्द केल्यास नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. येत्या काळात सरकार एलपीजी गॅस सिलेंडरवरील अनुदान रद्द करू शकते. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अनेक नागरिकांनी अनुदान घेतले नव्हते. केंद्रीय तेल आणि पेट्रोलियम तसेच नैसगिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या वस्तूंच्या किमती आता जागतिक बाजाराशी संबंधित आहेत. सरकारने 2020 21 या आर्थिक वर्षात एलीजी अनुदानासाठी 11,896 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर 2021-22 आर्थिक वर्षात सरकारने अनुदानावरील खर्च कमी करीत 242 कोटी रुपयांवर आणला. एका वर्षात सरकारने अनुदानावरील निधी कमी करीत 11,654 कोटी रुपयांची बचत केली आहे. संसदेत जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2018 मध्ये एलपीजी गॅसवरील अनुदानावर 23,464 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा आकडा 2019 मध्ये 37,209 कोटींवर पोहोचला. त्यानंतरच्या 2020 या आर्थिक वर्षात अनुदानावर 24,172 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 2021 मध्ये एलपीजी अनुदानावरील खर्चात सुमारे 50 टक्के कपात करण्यात आली. 2021 मध्ये अनुदानावर 11,896 कोटी रुपयांचा खर्च आला. त्यानंतर गेल्या वर्षीही सरकारने अनुदानावरील निधीत कपात केली.