गोंदियात मणिपूर घटनेचा तीव्र निषेध…

47

गोंदियात मणिपूर घटनेचा तीव्र निषेध, नराधमाना फाशी झाल्याच पाहिजेत, सावित्रीबाई फुले महिला संघटनांचे राष्ट्रपतींना निवेदन

गोंदिया शहर प्रतिनिधी 

राजेन्द्र मेश्राम 

मो: 9420513193

गोंदिया ता.25 जुलै :- मणिपूर येथील महिलांच्या अवमान प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करून दोषींवर कडक कार्यवाही करण्याच्या मागणीला घेऊन सवित्रीमाई महिला फालोवर्स संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतींच्या नावे (ता.24) निवेदन दिले.

जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांना हे निवेदन सादर करून निवेदनात म्हटलं आहे की,मणिपूर येथे जातीय हिंसाचार घडवून दोन निष्पाप महिलांची नग्न धिंड काढून त्यांचावर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना ही सम्राट अशोकांच्या भारतात अशोभनीय आहे. ह्या अमानुष घटनेचे आमचं संघटन तीव्र निषेध व्यक्त करतं!भारतीय राज्यघटनेच्या 42 व्या घटना दुरुस्तीनुसार महिलांचा सन्मान करणे हे लोकांचे कर्तव्य असून मणिपूरची ही घटना असैविंधानिक आणि संविधान विरोधी आहे.

कारगिलच्या युद्धात देशाचे संरक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या वीर पत्नीचा असा अपमान करणे हे जातीयवादी आणि संकीर्ण मानसिकतेच्या नराधमांनी केलेले घोर कृत्य आहे. तेव्हा या नराधमांवर कडक कार्यवाही करून त्यांना फाशीची शिक्षा ठोंठाविण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान आपल्या भावना कळल्या असून आपले निवेदन हे राष्ट्रपतींना सादर करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी श्री गोतमारे यांनी शिस्तमंडळाला दिली.

शिष्टमंडळात सवित्रीमाई फुले महिला फालोवर्स ग्रुपच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.