विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शन वर्ग

विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शन वर्ग

ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले मार्गदर्शन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- न्यू सिटी एज्युकेशन ट्रस्ट संचलित, न्यू सिटी सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी दोन मार्गदर्शन वर्ग शनिवार दिनांक 19 जुलै 2025 संपन्न झाले.
रायगड जिल्ह्यातील खारघर येथे असलेल्या हावरे बिल्डर्स यांच्या या शाळेमध्ये हाशीवरे हितवर्धक मंडळाचे महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्कृत अध्यापक ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांनी विद्यार्थी व शिक्षकांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
मुल कसे घडते जन्मपूर्व व जन्मानंतर ची परिस्थिती, कौटुंबिक आर्थिक व सामाजिक परिस्थिती शाळेत गेल्यानंतर घडणारा संस्कार, समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांकडून अप्रत्यक्ष शिकले जाणाऱ्या काही गोष्टी, आणि विद्यार्थ्याला शिक्षकांनी पालकांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनीचे करियर अतीश यशाच्या शिखरावर पोहोचून आनंददायी होते व जीवन आणि आयुष्य सुखमय आनंददायी व सुंदर होते. तसेच कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आत्महत्येपासून स्वतः कसे रोखावे याविषयी सुद्धा कुलकर्णी यांनी विशेष मार्गदर्शन केले.
याशिवाय आजच्या आधुनिक काळामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता किशोरवयीन अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या लैंगिक भावना त्याच्यावर असणारा अभ्यासाचा दबाव त्याच्याकडून असणाऱ्या पालकांच्या व शिक्षकांच्या अपेक्षा यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात ताणतणाव निर्माण होऊन त्याला मानसिक त्रास होण्याची असलेली शक्यता तसेच शिक्षकांनी पालकांशी संपर्क ठेवला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त अभ्यास आणि त्याचा भावनिक व मानसिक विकास करणे अत्यंत गरजेचे आहे याशिवाय शिक्षकांनी आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांचा कल व रस कशात आहे ते पाहून आपल्या अध्यापनात बदल करावे अशा प्रकारचे मार्गदर्शन ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांनी केले.
यावेळी शाळेतील आठवी ते दहावीचे 160 विद्यार्थी आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अध्यक्ष स्थानी शाळेचे प्राचार्य योगेश साळुंखे हे होते.