मुंबई दि. 25 – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लोकडाऊन करण्यात आले .त्यात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आता कोरोना पासून बचाव करण्याचे खबरदारी घेण्याचे जनतेचे प्रबोधन झाले असून कोरोना च्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविले जात असल्यामुळे टप्प्याटप्प्याने अनलॉक केले जात आहे. त्यात आता भाविकांसाठी मंदिर ;मस्जिद;चर्च; गुरुद्वारा ; बुद्धविहार ;देरासर खुली करावीत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले
यांनी केली आहे. या मागणी चे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

मुस्लिम समाजाच्या वतीने रिपाइंचे अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष हसन शेख आणि अनिस पठाण यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळाने ना रामदास आठवले यांना निवेदन देऊन मस्जिद सुरू करण्याची मागणी केली. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने जैन धर्मियांना आठवड्यातून दोन दिवस देरासर सुरू करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती रिपाइं अल्पसंख्यांक आघाडी च्या शिष्टमंडळाने ना रामदास आठवले यांना दिली. त्यावर सर्व धर्मोय प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवित असल्याचे ना रामदास आठवले यांनी आश्वासन दिले.

सर्व प्रार्थनास्थळे मास्क ;सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्स चे नियम पाळून सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे सुरू करावीत अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here