व्यक्तीविशेष: आज महान रुग्णसेवक पद्‌मश्री स्मृतीशेष संपतजी रामटेके यांचा जन्मदिवस

व्यक्तीविशेष: आज महान रुग्णसेवक पद्‌मश्री स्मृतीशेष संपतजी रामटेके यांचा जन्मदिवस

व्यक्तीविशेष: आज महान रुग्णसेवक पद्‌मश्री स्मृतीशेष संपतजी रामटेके यांचा जन्मदिवस
व्यक्तीविशेष: आज महान रुग्णसेवक पद्‌मश्री स्मृतीशेष संपतजी रामटेके यांचा जन्मदिवस

प्रशांत जगताप✒
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज
9766445348
नागपुर,दि.25ऑगस्ट:- गोर गरिबांना वेदनेच्या खायीत लोटणाऱ्या सिकलसेल आजारावर एक दोन नव्हे, तर तब्बल चाळीस वर्षे विविध पातळ्यांवर संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते, महान रुग्णसेवक, पद्‌मश्री संपतजी रामटेके यांचा 17 नोव्हेंबर 2017 रोजी संघर्ष जरी थांबला पण त्यांनी रुग्णसेवेने निर्माण केलेल्या महामेरू गरिब रुग्णाचा मनात कायम घर करुन राहिल..

जरी आज संपतजी रामटेके आपल्यात शरीराने नाही पण त्यानी केलेल्या कार्याने त्यांनी लाखो रुग्णाच्या मनावर आपली छाप शोडली आहे. संपतजी रामटेके यांनी सिकलसेल व्याधीग्रस्तांचा आवाज देशाच्या संसदेत पोचवला. एवढ्यावरच त्यांची सिकलसेलविरुद्धची लढाई थांबली नाही; तर संयुक्त राष्ट्रसंघातही त्यांनी व्याधीग्रस्तांच्या वेदना पोहोचवल्या. प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अमिर खान यांनी रामटेकेंच्या कार्याची दखल घेऊन ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात सिकलसेलकडे लक्ष वेधत रामटेके यांना सहभागी करून घेतले होते. दलित, आदिवासी, मुस्लिम समाजासह ओबीसीमध्ये सिकलसेल आढळतो. यामुळे सिकलसेल सामाजिक समस्या बनलेला आजार आहे, अशी ओळख त्यांनी मिळवून दिली.

सिकलसेलचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसह सिकलसेल आजारासंदर्भात जनजागृतीसह सिकलसेलग्रस्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकाकी लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली होती. नगरसेवकापासून तर राष्ट्रपती यांच्यापर्यंत रामटेके यांनी सिकलसेलग्रस्तांच्या वेदना पोचविल्या. याची दखल घेत राज्य सरकारने मेयोत सिकलसेल संशोधन केंद्र, मोफत उपचार, गरीब सिकलसेलग्रस्तांना ६०० रुपये मासिक मानधन, दहावी आणि १२ वीच्या विद्यार्थ्याना २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ, मेडिकलमध्ये सिकलसेल डे केअर सेंटर, मोफत गर्भजल परीक्षण, मोफत एसटी पास योजना सुरू केली. बालधोरणातही सिकलसेलचा समावेश व्हावा यासाठीही त्यांनी संघर्ष केला. याबाबत त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात सिकलसेलचा समावेश करण्यासाठी राष्ट्रपतींना निवेदन दिले. रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलतींसह सिकलसेलग्रस्तांना दिव्यांग व्यक्तीचे अधिकार आणि कायद्यातही समावेश करण्याची लढाई रामटेके यांनी जिंकली. सिकलसेलग्रस्तांसाठी लढणे, हेच त्यांच्या आयुष्याचे अंतिम ध्येय बनले होते.