गौरी गणपती साठी श्रीवर्धन रायगड पोलीस यंत्रणेला खास सूचना देण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे श्रीवर्धन ठाण्यात उपस्थित

रशाद करदमे

श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी

मो: 9075333540

श्रीवर्धन: श्रावण संपताच आता सर्व सणांची सुरवात होत आहे. काही दिवसांत हिंदूचा आवडत सण गणपती हा उत्सव साजरा करण्यात येईल. मुंबईतील चाकरमानी आपआपल्या गावी येवून हा सण मोठ्या भक्ती भावाने आनंदाने साजरा करतात, जागरण करून एकमेकांच्या घरी येत -जातात,

सध्या रायगड जिल्हातील श्रीवर्धन तालुक्यामधील हरेश्वर येथे एक शस्त्रांनी भरलेली बोट आढळून आल्याने मोठी जबाबदारी सरकारी यंत्रणांवर आली आहे. सणा सुदिच्या या काळामध्ये कोणताही अनुचित प्रसंग घडू नये. व सणानांकाही गालबोट लागू नये.यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याच पार्श्वभूमी वर आज श्रीवर्धन पोलिस ठाण्या मध्ये महत्वाची व जबाबदारीची मिटिंग घेण्यात आली.

या चर्चेसाठी स्वतः अलिबाग हुन सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. अतुल उत्तमराव झेंडे. पोलीस उपअधीक्षक श्री. प्रशांत स्वामी, पोलीस निरीक्षक श्री. संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. उमेश खिरड. आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. विराज लबडे हे उपस्थित होते. तसेच बोर्ली आणि म्हसळा येथील ऑफिसर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here